Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत आणखी घट

आज सकाळी 7 वाजेपर्यंत 8 लाखाहून अधिक आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले

आज भारतातील सक्रिय प्रकरणे 1,92,308 इतकी आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सक्रिय रुग्णांचा वाटा आता कमी होऊन 1.81% झाला आहे.

दररोज बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आणि नवीन रुग्णसंख्या कमी होत असल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय प्रकरणात 4,893 ची घट नोंदवण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावर सक्रिय प्रकरणांमध्ये सातत्याने घसरणीचा कल असल्याने 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 7,689 आहे.

देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 73% हे केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यात आहेत.

21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत एकूण 8,06,484 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 2,398 सत्रामध्ये 1,31,649 लोकांना लस देण्यात आली. आत्तापर्यंत 14,118 सत्रे घेण्यात आली आहेत.

S. No. State/UT Beneficiaries vaccinated
1 A & N Islands 644
2 Andhra Pradesh 91,778
3 Arunachal Pradesh 3,023
4 Assam 7,585
5 Bihar 47,433
6 Chandigarh 469
7 Chhattisgarh 16,255
8 Dadra & Nagar Haveli 125
9 Daman & Diu 94
10 Delhi 12,902
11 Goa 426
12 Gujarat 21,832
13 Haryana 30,402
14 Himachal Pradesh 5,094
15 Jammu & Kashmir 4,414
16 Jharkhand 11,641
17 Karnataka 1,21,466
18 Kerala 24,269
19 Ladakh 240
20 Lakshadweep 369
21 Madhya Pradesh 27,770
22 Maharashtra 52,055
23 Manipur 1454
24 Meghalaya 1365
25 Mizoram 1508
26 Nagaland 2,988
27 Odisha 68,743
28 Puducherry 759
29 Punjab 7,607
30 Rajasthan 32,379
31 Sikkim 573
32 Tamil Nadu 33,670
33 Telangana 69,405
34 Tripura 3,734
35 Uttar Pradesh 22,644
36 Uttarakhand 6,119
37 West Bengal 46,310
38 Miscellaneous 26,940
Total 8,06,484

 

गेल्या 24 तासांत 19,965 रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 10,265,706 रुग्ण बरे झाल्याने रुग्ण बरे होण्याचा दर आता 96.75% झाले आहे.

नव्याने बरे झालेल्यांपैकी 87.06% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये एका दिवसात सर्वाधिक 7,364 रुग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,589 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन रुग्णांपैकी 83.84% हे आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले आहेत.

केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत दररोजच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 6,815 इतके नवीन रुग्ण आढळले. तर काल महाराष्ट्रात 3,015 आणि छत्तीसगडमध्ये 594 नवीन प्रकरणे नोंदली गेली.

गेल्या 24 तासांत झालेल्या 151 मृत्यूंपैकी 83.44% आठ राज्ये / केंद्रशासित पप्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात 59 मृत्यूंची नोंद झाली. केरळ आणि छत्तीसगडमध्ये अनुक्रमे 18 आणि 10 नवीन मृत्यूची नोंद झाली.

19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 111 मृत्यू होतात तर मृत्यूचे प्रमाण 1.44% आहे.

दुसरीकडे, 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

Exit mobile version