पेट्रोलचे 82 रुपये, तर डिझेल 72 रुपये लिटर; म्हणून या ठिकाणी होतेय गर्दी

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऐन दिवाळीत गगनाला भिडलेले होते. महाराष्टÑात पेट्रोलचे दर 116 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे आधीच असलेल्या महागाईत या दरवाढीने आणखी भर टाकली. मात्र केंद्र सरकारने अलिकडेच या दरवाढीतून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलचे दर पाच रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे 10 रुपये प्रतिलिटर पर्यंत कमी केले.

अबकारी करात ही कपात केल्याने पेट्रोल डिझेलचे भाव घटले, मात्र ते इतकेही कमी झाले नाहीत की 100 रुपयांच्या खाली आले आहेत. त्यातही अनेक राज्यांनी दोन ते 7 रुपयांनी इंधन दरात कपात करून सामान्यांना दिलासा दिला. मात्र तरीही हे दर शंभराच्या वर असून महागाई वर कहीही परिणाम झालेला नाही. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील लोकांना मात्र आजही अतिशय कमी दरात पेट्रोल आणि डिझेल मिळत आहेत.

या ठिकाणचे लोक पेट्रोलसाठी 82. 65 रुपये प्रति लिटर, तर डिझेलसाठी 72.03 रुपये प्रतिलिटर इतके पैसे मोजत आहेत. देशात सगळीकडे इंधन दर भडकलेले असताना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना इतके स्वस्त इंधन कसे परवडते.? याचे मुख्य कारण आहे या राज्यांच्या सीमेवरील देश. नेपाळ.
होय ! नेपाळमध्ये आजही भारताच्या तुलनेत इंधनाचे दर 20 ते 25 रुपयांनी स्वस्त आहे. परिणामी सीमेवरील भारतीय पेट्रोल भरण्यासाठी सध्या नेपाळमध्ये रांगा लावताना दिसत आहे. भारत आणि नेपाळमधील नागरिकांना दोन्ही देशांत येण्याजाण्यासाठी परवानगी असल्याने असं घडतंय खरी.

नेपाळमधील बिहारच्या सीमेवर असलेल्या पर्सा येथे पेट्रोलचे दर प्रति लिटर 132.25 नेपाळी रुपये, अर्थात भारतीय चलनानुसार 82. 65 रुपये; तर डिझेलचे दर 115.25 नेपाळी रुपये अर्थातच भारतीय चलनानुसार 72.03 रुपये इतके असल्याने सध्या भारतीय लोकांची इथे इंधन भरण्यासाठी गर्दी होत आहे. लोक रांगा लावून एकदाच टाकी फूल करून येताना दिसत आहे. नेपाळ हे भारतापेक्षा तुलनेने मागास आणि गरीब राष्टÑ आहे. मात्र इंधनाचे दर आपल्यापेक्षाही तिथे कमी असल्याचे दिसत आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.