“पोल्ट्री उदयोगातील संधी” या विषयावर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन

सध्या देशभरामध्ये कोव्हीड -19 च्या प्रादूर्भावामुळे लॉकडाउन सुरू आहे. सदर लॉकडाउन पुर्णत: उठल्यानंतर विवीध क्षेत्रांमध्ये रोजगार, स्वयंरोजगार व उदयोगांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी साधण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेमार्फत  “पोल्ट्री उदयोगातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम फेसबूकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

पारंपारीक शेतीला दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन इत्यादी कृषीपूरक व्यवसायांच्या मदतीने अनेक शेतक-यांनी आपली प्रगती केली आहे. देशभरात सुरू असलेल्या कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर अंडी, चिकन या पोल्ट्री उत्पादनांच्या मागणीमध्ये मोठया प्रमाणवर वाढ झाली आहे. त्यामुळे युवकांनी पोल्ट्री उदयोगातील कौशल्य आत्मसात करून या परिस्थितीचा लाभ घेणे आवश्यक आहे.

या सर्व बाबींचा विचार करून पोल्ट्री उदयोगात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? नविन पोल्ट्री उदयोग सूरू कसा करावा? याबाबत मार्गदर्शन होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक कार्यालयाने “पोल्ट्री उदयोगातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 4:00 वाजता करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात गेल्या 20 वर्षांपासून या पोल्ट्री उदयोगात कार्यरत असलेले,एव्ही ब्रॉयलर ही कंपनी स्थापन करून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्त्म दर्जाची पिल्ले, खादय व वेळोवेळी मार्गदर्शन देउन नाशिक जिल्हयामध्ये पोल्टी उदयोगाची चळवळ उभी करून हजारो तरूणांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणारे, व युवकांना प्रेरणा देणारे एव्ही ब्रॉयलरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. श्रीकृष्ण (दादा) गांगूर्डे हे मार्गदर्शन करणार आहे.

सदर कार्यक्रम या कार्यालयाचे अधिकृत फेसबूक पेज https://www.facebook.com/NashikSkill वर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व यामध्ये काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी 0253-2972121 अथवा nashikrojgar@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन संपत चाटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, नाशिक यांनी केले आहे.

हा मार्गदर्शन कार्यक्रम खालील फेसबुक लिंकवर लाइव्ह पाहता येईल.

➡फेसबुक पेज लाइव्ह –
www.facebook.com/NashikSkill

➡️युट्यूब-
www.youtube.com/NashikSkill