सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी शिखर परिषदेचे आयोजन

‘जागतिक अन्न दिन’ निमित्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे फूड टेक समिट 2021 चे आयोजन

जागतिक अन्न दिनानिमित्त, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  (PMFME) योजनेअंतर्गत 16 ऑक्टोबर 2021 रोजी फूड टेक शिखर परिषद आयोजित केली होती. अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञानसंबंधी नवसंशोधनातील नवीन उदयोन्मुख पद्धतींबाबत सूक्ष्म उद्योगांना प्रशिक्षण, चर्चा आणि अवगत करण्यासाठी फूड-टेक हितधारकांना एक मंच उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा उद्देश होता.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सहसचिव मिन्हाज आलम यांनी फूड टेक शिखर परिषदेला संबोधित केले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राचे महत्त्व तसेच पीएमएफएमई योजनेद्वारे भारतात अन्न प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

सूक्ष्म उद्योगांसाठी देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर अन्न प्रक्रिया क्षेत्रात मार्ग सुकर करण्याबाबत  मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रख्यात उद्योजक या परिषदेला उपस्थित होते.

 

अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठीची शिखर परिषद, हा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा एक उपक्रम असून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने हितधारकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याबाबत सद्यस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

विविध मान्यवर वक्त्यांच्या सहभागाव्यतिरिक्त, शिखर परिषदेत राज्यभरातील शासकीय अधिकारी आणि अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योगांचा सहभाग दिसून आला. याचे यशस्वीपणे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आणि सर्व हितधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.