Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग या चुका टाळाच !

तुम्ही नोकरदार असा किंवा व्यावसायिक इन्कम टॅक्स रिटर्न भरणे तुम्हाला आवश्यक असते. हे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आलेली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयटीआर भरताना काही चुका टाळणे हिताचे असते. जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल…

बचतीमधून येणारे व्याज-
जर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारची बचत केली असेल, तर ते रिटर्न भरताना नक्कीच दाखवा. या बचतींमध्ये मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), किसान विकास पत्र, NSC इत्यादींचा समावेश आहे. व्याजातून मिळणारे उत्पन्न करपात्र आहे की नाही, ते बँकेत किंवा पोस्टात असलेल्या सर्व बचत एकत्रित करून येणाऱ्या व्याजावर मोजले जाते. तुमच्या ITR मध्ये हे नक्की दाखवा.

डिव्हिडंड-बॉन्ड्समधून मिळकत-
बाँड्स आणि कोणत्याही प्रकारचे लाभांश कराच्या अधीन आहेत. जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे ती कंपनी तुम्हाला त्यातील काही हिस्सा नफ्यावर देते. याला लाभांश म्हणतात. हे उत्पन्नही तुम्हाला दाखवावे लागेल.

जीवन किंवा आरोग्य विमा –
जर तुम्ही जीवन किंवा आरोग्य विमा घेतला असेल, तर रिटर्न भरताना याचाही उल्लेख करा. इन्शुरन्सचा फायदा तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये मिळतो. जीवन विमा वार्षिक प्रीमियमच्या १० पट असेल, तर तुम्हाला कलम १०(१०डी) अंतर्गत करातून सूट मिळते.

शेअर बाजारातील उत्पन्न-
जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकता तेव्हा त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला भांडवली नफा म्हणतात. शेअर बाजारातील गुंतवणूक दोन कालावधीसाठी केली जाते – अल्पकालीन आणि दीर्घकालीन. दीर्घ मुदतीची गुंतवणूक ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी असते.अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्म शेअर्स विकता तेव्हा त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात आणि लाँग टर्म शेअर्स विकणे याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणतात.देशातील स्टॉक्स आणि इक्विटी फंडातून अल्प मुदतीचा भांडवली नफा करपात्र असतो. दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त असतो.

मालमत्ता विकून मिळवलेले सोने
जर तुम्ही सोने, मालमत्ता, इत्यादी विकल्या असतील, तर तेही कर फॉर्ममध्ये दाखवणे आवश्यक आहे. या वस्तूंमधून अल्पकालीन भांडवली नफ्यावर सामान्य दराने कर आकारला जातो.

बचतीचा करा उल्लेख
रिटर्न भरताना करपात्र तसेच सूट मिळणाऱ्या उत्पन्नाचाही खुलासा करावा. यामध्ये पीपीएफ, पीएफ, शेअर बाजारातून दीर्घकालीन भांडवली नफा इ. हे उत्पन्न दाखवून , तुम्ही ते भविष्यात कधीही बिनदिक्कतपणे वापरू शकता. आयटीआर-१ फॉर्ममध्ये कर-सवलत उत्पन्न दर्शवण्यासाठी एक विभाग देखील आहे.

लपवू नका मोठी खरेदी
महागडी कार, प्रॉपर्टी इत्यादीसारखे मोठे व्यवहार करत असाल किंवा मोठी रक्कम गुंतवली तर त्याची माहितीही आयकर विभागाला द्या. कारण ज्या लोकांशी व्यवहार करत आहात त्यांच्यामार्फत विभागाला ही माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर कधी तुम्हाला या खरेदीचा किंवा गुंतवणुकीचा स्रोत विचारला गेला, तर तुम्ही कर रिटर्नमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रश्न-उत्तर सहज देऊ शकता.

Exit mobile version