भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांंनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन आज सकाळी उड्डाण केले आहे. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन आसनांची आहेत.
फ्रान्सच्या दासो कंपनीतून मागवलेली ही सर्व विमाने दोन टप्प्यांमध्ये भारतात येतील. ह्या पहिल्या टप्प्यातील पाच विमाने भारतीय वायुदलाचे विशेष प्रशिक्षित वैमानिक उड्डाण करून घेऊन येत आहेत. या विमानांच्या उड्डाणाच्या दरम्यानच भारतीय वैमानिक त्यामध्ये इंधनही भरणार असून त्यासाठी फ्रेंच वायुदलाने इंधन वाहू विमानेही पाठवली आहेत.
हवामान स्वच्छ राहिल्यास ही विमाने अंबाला इथल्या वायुसेना तळावर 29 जुलै 2020 रोजी पोचतील अशी अपेक्षा आहे. या नव्या राफेल विमानांसाठी भारतीय वायुसेनेची 17 क्रमांकाची स्क्वाड्रन ‘गोल्ड्न अॅरो’ अंबाला वायुसेना तळावर उभारण्यात आली आहे.