Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेंगा न आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनवर फिरवला रोटाव्हेटर

पिकाची आशा हिरावल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पिक अज्ञात रोगाचे बळी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी पावसाने पिकाचे नुकसान केले परत यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पेरले भरपूर मेहनत करून सुद्धा सोयाबीनचे झाड वाढले. परंतु शेंगा लागल्या नाही. यामुळे आर्वी , कवठा, फरीदपुर गावातील तीन शेतकरी बांधवांनी आपल्या उभ्या सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फिरवला.

आर्वी येथील शेतकरी वासुदेव सावसाकडे यांनी महागडे सोयाबीनचे बियाणे खरेदी करून ५ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती.मात्र त्याला शेंगाच लागल्या नाही. तर कवठा येथील शेतकरी संजय कष्टी यांनी आपल्या ३ एकरात सोयाबीनची पेरणी केली.मात्र त्यांच्याही सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला तर शिवणफळ येथिल शेतकरी भारत पात्रकर यांनी आपल्या पाच एकर शेतजमीनीत सोयाबीनची पेरणी केली. मात्र पाचही एकरातील सोयाबीला शेंगा लागल्या नाही.

यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नसल्याने वैतागू उभ्या सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फिरवून सोयाबीनचे पीक जमिनदोस्त केले आहे.आता तर सरकारने याकडे लक्ष देऊन आर्थिकदृष्ट्या हावालदील झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Exit mobile version