शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन करावे

शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करुन उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

कारखेडा ॲग्री प्रोड्युसर कंपनी व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी मोहाडी येथील गोट बँक ऑफ कारखेडा या प्रकल्पाला  ॲड ठाकूर यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे, गोट बँक ऑफ कारखेडाचे अध्यक्ष नरेश देशमुख, उपाध्यक्ष के.जी. देशमुख, संचालक शरद देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांनी प्रकल्पाबाबत माहिती देवून शेळी पालन, शेळीला लागणारे खाद्य, त्यांचे व्यवस्थापन आदी माहिती दिली. गोट बँक ऑफ कारखेड या प्रकल्पाची माहिती देणाऱ्यां वेबसाईटचे (www.gootbankofkarkhed.in) विमोचनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.