पोषण वाटिकेच्या माध्यमातून कौटुंबिक पोषण सुरक्षा

मोहोळ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर इफको, महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ व आत्मा, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने पोषण वाटिका महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. तसेच याप्रसंगी श्री. नरेंद्रसिंह तोमर, माननीय केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, भारत सरकार यांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग द्वारे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हे सौ. रत्नमाला पोतदार, मा. सभापती पंचायत समिती, मोहोळ यांचे हस्ते झाले, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ चे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सोमनाथ लामगुंडे, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, सोलापूर, हे उपस्थित होते. याप्रसंगी श्री. श्रेयस मोहिते, इफको, सोलापूर, श्री. सुहास ढवळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, मोहोळ, श्री. योगेश बोडके, तालुका उपजीविका विकास सल्लागार, मोहोळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमदारम्यान कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ व इफको यांच्या सहयोगाने महिला शेतकरी, शेतकरी व ग्रामीण युवक, युवती यांना “पोषण परसबाग बियाणे किट”, रोपे व फळझाडांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात श्री. दिनेश क्षीरसागर, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी ही विषद करून कार्यालयामार्फत राबविण्यात येणार्याक पोषणमूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत पोषण परसबाग व जैव समृद्ध पिकांचे वाण ज्यात लोह व जस्त या खनिजांचे तसेच आवश्यक जीवनसत्वांचे प्रमाण जास्त आहे अश्या वाणांचा प्रसार केला जात आहे.
सौ. रत्नमाला पोतदार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ग्रामीण महिलांनी व युवतींनी स्वतःच्या आहार व आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच, कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याचे कौतुक करून पोषण अभियान चळवळींचे महत्व स्पष्ट केले. श्री. सोमनाथ लामगुंडे यांनी पोषण वाटिकाचे काळजीपूर्वक माहिती घेऊन लागवड करावी जेणेकरून महिला व बालकांना पोषक व सेंद्रिय भाजीपाला, फळे घरच्याघरी उपलब्ध होतील. त्यामुळे बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी होईल व महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी सुयोग्य राहण्यास मदत होईल असे नमूद करून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. तानाजी वळकुंडे यांनी शेतकरी, महिला शेतकरी व ग्रामीण युवती यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत पोषण अभियान अंतर्गत सक्रिय सहभाग घेवून पोषण परसबागच्या माध्यमातून कौटुंबिक पोषण सुरक्षा साध्य करावी असे नमूद केले. तसेच कृषि विज्ञान केंद्रा मार्फत दरवर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जातो. यामध्ये विशेषत: महिला व बालकांकरिता विविध पोषण विषयक जागृकता कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे नमूद केले.
तांत्रिक संत्रांत डॉ. शरद जाधव, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) हे पौष्टिक तृणधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयावर, श्री. दिनेश क्षिरसागर, विषय विशेषज्ञ, (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) हे पौष्टिक तृणधान्यातील पोषण तत्वे, मानवी आहारातील महत्व व पोषण वाटिका आणि डॉ. विशाल वैरागर, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) हे वृक्षारोपण आणि ग्रामीण उपजीविका या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथिल पोषण वाटिका व पीक संग्रहालय तेथे शिवारफेरी घेण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी डॉ. विशाल वैरागर, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार), डॉ. शरद जाधव, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या), डॉ. पंकज मडावी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), डॉ. सूरज मिसाळ, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र), श्री. सुयोग ठाकरे, कार्यक्रम सहाय्यक (संगणक), श्री. तुषार अहिरे, कार्यक्रम सहाय्यक (प्र. तं), श्री. रवी साखरे, श्री. ज्ञानेश्वर तांदळे, श्री. अरुण गांगोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.