नवीन देशांमध्ये भारताचा आंबा निर्यातीचा विस्तार

भौगोलिक निर्देशक प्रमाणित फझील आंब्याची बहारीनला निर्यात

कोविड 19 महामारीमुळे उद्भवलेल्या दळणवळाच्या  आव्हानांनावर मात करत, या हंगामात भारताने आंब्याच्या निर्यातीचा विस्तार नवीन देशांमध्ये वाढवला आहे. पूर्वेकडील देशांपासून विशेषत: मध्य पूर्व देशांपर्यंत,आंबा निर्यात क्षमता वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत  पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात उत्पादित भौगोलिक निर्देशक (जीआय) प्रमाणित फझील आंब्याची निर्यात आज बहारीनला करण्यात आली. कोलकात्याच्या एपेडा नोंदणीकृत डीएम एंटरप्रायजेसकडून फझील आंब्याच्या मालाची निर्यात करण्यात आली आणि बहारीनच्या अल जझीरा समूहाकडून या आंब्याची आयात करण्यात आली.

अपारंपरिक प्रदेश आणि राज्यांतून आंब्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा उपाययोजना करत आहे. आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आभासी माध्यमातून खरेदीदार-विक्रेते बैठक आणि महोत्सव आयोजित करत आहे. कतारमधील दोहा येथे अपेडाने आंबा प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या महोत्सवात इमपोर्टर फॅमिली फूड सेंटरच्या दुकानांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील भौगोलिक निर्देशक प्रमाणित नऊ प्रकाराचे आंबे ठेवण्यात आले होते त्यानंतर काही दिवसांनीच बहारीनला आंब्याची निर्यात करण्यात आली.

बहरीन समुहामधील 13 दुकानांमधून आंब्याच्या वाणांची विक्री करण्यात आली. बंगाल आणि बिहारमधील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला आंबा अपेडा नोंदणीकृत निर्यातदारांकडून खरेदी करण्यात आला.

या हंगामात पहिल्यांदाच आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि चित्तोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्पादित जीआय प्रमाणित बंगनापल्ली आणि अन्य जातीच्या सुरवर्णरेखा आंब्यांच्या 2.5 मेट्रिक टन (एमटी) मालाची निर्यात भारताने अलीकडेच केली आहे.