Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी कालवश

देशाचे माजी राष्ट्रपतीभारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी (वय ८४ ) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना दिल्लीतील रिसर्च एंड रेफरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना सेप्टिक शाॅक आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते कोमामध्ये होते. म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याआधी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.

राष्ट्रीय राजकारणात १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये अने कॅबिनेट मंत्रीपदे भूषवली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी कॉंग्रेस पक्षामधून राजीनामा दिला होता.

इतिहासराज्यशास्त्रअर्थशास्त्रकायदा या क्षेत्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी पाच दशकांहून अधिक काळ राजकीयसामाजिकशैक्षणिकसाहित्य क्षेत्रात संवेदनशीलपणे काम करत आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला. देशाच्या राजकारणातील अभ्यासू, कर्तुत्ववान, सर्वसमावेशक नेतृत्वं म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. 

प्रंचंड अभ्यासू असल्याने त्यांनी देशाच्या परराष्ट्रसंरक्षणवाणिज्य आणि अर्थमंत्री या विविध महत्वाच्या पदांची जबाबदारी अतिशय कुशल पद्धतीने सांभाळली. आपल्या संवेदनशील कार्यातून त्यांनी ती सिद्ध देखील केली. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती पदावर काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या निधनाने देशातील एक विद्वान राजनेता’ काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Exit mobile version