देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी (वय ८४ ) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना दिल्लीतील रिसर्च एंड रेफरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना सेप्टिक शाॅक आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते कोमामध्ये होते. म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याआधी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.
राष्ट्रीय राजकारणात १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये अने कॅबिनेट मंत्रीपदे भूषवली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी कॉंग्रेस पक्षामधून राजीनामा दिला होता.
India grieves the passing away of Bharat Ratna Shri Pranab Mukherjee. He has left an indelible mark on the development trajectory of our nation. A scholar par excellence, a towering statesman, he was admired across the political spectrum and by all sections of society. pic.twitter.com/gz6rwQbxi6
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2020
इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा या क्षेत्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी पाच दशकांहून अधिक काळ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात संवेदनशीलपणे काम करत आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला. देशाच्या राजकारणातील अभ्यासू, कर्तुत्ववान, सर्वसमावेशक नेतृत्वं म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं.
Sad to hear that former President Shri Pranab Mukherjee is no more. His demise is passing of an era. A colossus in public life, he served Mother India with the spirit of a sage. The nation mourns losing one of its worthiest sons. Condolences to his family, friends & all citizens.
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2020
प्रंचंड अभ्यासू असल्याने त्यांनी देशाच्या परराष्ट्र, संरक्षण, वाणिज्य आणि अर्थमंत्री या विविध महत्वाच्या पदांची जबाबदारी अतिशय कुशल पद्धतीने सांभाळली. आपल्या संवेदनशील कार्यातून त्यांनी ती सिद्ध देखील केली. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती पदावर काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या निधनाने देशातील एक ‘विद्वान राजनेता’ काळाच्या पडद्याआड गेला आहे.