मुंबई– कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी मेळावे घ्या तसेच ग्राम पंचायत पातळीवर बैठकी घेऊन “कृषी धोरण-२०२०”ची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच वीज जोडण्यासाठी पैसे भरूनही आजवर कृषी पंप जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहेत.