Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पीएम किसान योजनेचा हप्ता येत्या 15 डिसेंबरपर्यंत मिळणार; पण …

पीएम किसान सम्मान योजनेचा दहावा हप्ता येत्या 15 डिसेंबरपर्यंत दिला जाणार आहे. तुम्ही लाभार्थी शेतकरी असाल आणि आतुरतेने वाट पाहत असाल तर लगेच ई-केवायसी पूर्ण करा. याशिवाय तुमचा हप्ता जमा होऊ शकणार नाही. कारण सरकारने या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे.

पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रावर संपर्क साधा.
घरी बसूनही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे साध्य करू शकता. त्यासाठी पुढील पद्धत वापरा
१. यासाठी प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
२. उजव्या बाजूला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
३. आता आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
४. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर त्यावर आलेला OTP टाका.
५. जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid असा येईल.
६. असे झाल्यास तुमचा हप्ता उशीर होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.

 

योजनेचा लाभ कसा घ्यावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. आधार कार्ड
2. अद्ययावत केलेले बॅँक खाते
3. पासपोर्ट आकाराचे फोटो
4. रहिवासाचा पत्ता सांगणारे कागदपत्र
5. जमिनीची कागदपत्रे

सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूला दिलेल्या रकान्यावर क्लिक करून माहिती भरा. या संकेतस्थळावरील मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करूनही ही माहिती भरता येईल.

पी.एम.किसान योजना

हे सुद्धा वाचा  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ

खालील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत

1.सर्व संस्थात्मक जमीनधारक
2.खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधीत शेतकरी कुटूंब
i) संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.
ii) आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
iii) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
vi)सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
v) मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
vi) नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

Exit mobile version