Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील हवामान बदलावरील ई-अहवाल सादर

वर्ष 2020 हे 1901 पासूनचे आठवे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले.

सर्वात उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदवल्या गेलेल्या वर्षांपैकी बारा वर्षे ही गेल्या पंधरा वर्षातील म्हणजे 2006-2020 मधील वर्षे आहेत.

मागील दशक (2001 – 2010/2011 – 2020) हे देखिल नोंदवले गेलेल्या सर्वाधिक उष्ण दशककांपैकी एक आहे.

देशभरात झालेला नैऋत्य मौसमी हंगामातील (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा जास्त (109% of LPA) होता.

देशभरातील  2020 या वर्षातील ईशान्य मोसमी हंगामामधील पावसाचे प्रमाण सर्वसाधारण होते.

2020 मध्ये उत्तर हिंद महासागरात पाच वादळे तयार झाली. ही वादळ म्हणजे अतीशक्तिशाली वादळ ‘अम्फान’, अतितीव्र चक्रीवादळ ‘निवारा’ आणि ‘गती’,  तीव्र चक्रीवादळ ‘निसर्ग’ आणि चक्रीवादळ ‘बुरेवी’.

हवामानासंबधीत प्रभावी मोठ्या घटना देशात घडल्या. उदाहरणार्थ अतिशय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे, वादळ, विजांचे थैमान, थंडीची लहर इत्यादी.

विशेष महत्वाचे:

वार्षिक पृष्ठभाग तसेच हवेचे तापमान वर्ष 2020 मध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. यावर्षी देशभरात जमीन आणि हवेचे तापमान हे सरासरी +0.290C राहिले. (1981 ते 1900 मधील माहितीवर आधारित)

देशभरातील हवामानाच्या नोंदी 1901 पासून केल्या जातात. या नोंदींनुसार 2020 हे आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे.

जागतिक पातळीवर पृष्ठभाग तापमानातील फरक 2020 मध्ये (जानेवारी तो ऑक्टोबर WMO स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट) हा +1.20C राहिला. (source: https://public.wmo.int/en/our-mandate/climate/wmo-statement-state-of-global-climate).

Exit mobile version