Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ४५९ पूरबाधित कुटुंबाना अन्नधान्य वाटप

जुलै महिन्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून पूरबाधितांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 तूर डाळ व केरोसीन देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम व आमदार मोहन कदम यांच्या हस्ते आज पलूस तालुक्यातील अंकलखोप तसेच अमणापूर व बुर्ली येथे पूरग्रस्तांना धान्य वाटप करण्यात आले

सांगली जिल्ह्यात 43 हजार 318 पूरबाधित कुटुंब असून आतापर्यंत 459 कुटुंबाना  10 किलो गहू, 10 किलो तांदूळ याप्रमाणे 4.59 मेट्रिक टन गहू, 4.59 मेट्रिक टन तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सांगली ग्रामीण 47 कुटुंबे, मिरज ग्रामीण 45 कुटुंबे, वाळवा 105 कुटुंबे, आष्टा 18 कुटुंबे, शिराळा 244 अशा 459 कुटुंबाचा समावेश आहे. तूर डाळ व केरोसीन उपलब्ध झाल्यास त्यांचेही वाटप त्वरित करण्यात येईल.

Exit mobile version