नाशिक, दि.२९ : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत शासनाने जाहीर केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असून उर्वरीत 6 जणांचे तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच त्यांना देखील धनादेश अदा करण्यात येतील, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
या वारसांना करण्यात आले धनादेशाचे वितरण:
ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले अमरदीप नारायण नगराळे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मंगला नगराळे यांना धनादेश अदा करण्यात आलेला आहे. भारती बंडू निकम यांचे वारस म्हणून त्यांची मुलगी तेजस्विनी बंडू निकम, श्रावण रामदास पाटील यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मालुबाई पाटील, मोहना देवराम खैरनार यांचे वारस म्हणून त्यांचे पती देवराम गणपत खैरनार यांना तर सुनिल भिमा झाल्टे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी सुवर्णा झाल्टे यांना धनादेश अदा करण्यात आला आहे.
सल्मा फकीर मोहम्मद शेख यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा इरफान फकीर मोहम्मद शेख, भैय्या सांदूभाई सैय्यद यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा साहिल सैय्यद, प्रवीण पिरसिंग महाले यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी जयश्री महाले तर
मंशी सुरेन्द्र साह यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी ममता देवी यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. सुगंधाबाई भास्कर थोरात यांचे वारस म्हणून मुलगा विनोद थोरात तर हरणबाई ताटेराव त्रिभुवन यांचे वारस म्हणून मुलगी संगिता झाल्टे यांना धनादेश अदा करण्यात आला आहे.
रजनी रत्नाकर काळे यांचे वारस म्हणून त्यांचे पती रत्नाकर काळे यांना तर गिता रावसाहेब वाकचौरे यांचे वारस म्हणून त्यांचे पती रावसाहेब वाकचौरे यांना धनादेश अदा करण्यात आला आहे. संदीप हरीश्चंद्र लोखंडे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी निता संदिप लोखंडे यांना तर बुधा लक्ष्मण गोतरणे यांचे वारस म्हणून त्यांची मुलगी पुष्पा ज्ञानेश्वर माढे, वैशाली सुनिल राऊत यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा कृष्णा राऊत यांना धनादेश अदा करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिली आहे.
ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत पंढरीनाथ नेरकर, प्रमोद वालूकर, आशा शर्मा, बापूसाहेब घोटेकर, वत्सलाबाई सुर्यवंशी, नारायण गंगा इराक या सहा मृतांच्या वारसांना तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच धनादेशाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.