Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पहिल्या तिमाहीसाठी जीडीपी मध्ये 23.9 टक्क्यांची घसरण

वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादनाचे अंदाज

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), 2020-21 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादना(जीडीपी) चा जीडीपीच्या खर्चाच्या घटकांच्या संबंधित त्रैमासिक अंदाजासह स्थिर मूल्य (2011-12) आणि चालू मूल्य अंदाज जाहीर केला आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत स्थिर मूल्य (2011-12) साठी जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, वर्ष 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत ते 35.35 लाख कोटी रुपये होते. 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील 5.2 टक्क्यांच्या वृद्धीच्या तुलनेत यामध्ये 23.9 टक्क्यांची घसरण निदर्शनाला आली आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत चालू मूल्य साठी जीडीपी 38.08 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, वर्ष 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत ते 49.18 लाख कोटी रुपये होते. 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील 8.1 टक्क्यांच्या वृद्धीच्या तुलनेत यामध्ये 22.6 टक्क्यांची घसरण निदर्शनाला आली आहे.

पहिल्या तिमाहीचा अंदाज कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाकडून प्राप्त झालेल्या वर्ष 2019-20 च्या रबी हंगामातील (जे जून 2020 मध्ये संपले) कृषी उत्पादनावर; प्रामुख्याने पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभागातील पशुधन क्षेत्रासाठी दूध, अंडी, मांस आणि लोकर यांच्या उत्पादनांचे निर्धारित लक्ष्य, आणि मत्स्यपालन विभागातील माशांचे उत्पादनाचा डेटा यावर आधारित आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी); महालेखा नियंत्रक (सीजीए) द्वारे नियंत्रित केंद्र सरकारच्या खर्चाचा मासिक लेखा, एप्रिल ते जून 2020-21 या कालावधीसाठी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) द्वारे  नियंत्रित राज्य सरकारांच्या  खर्चाचा मासिक लेखा वापरण्यात आला आहे. अंदाजपत्र तयार करताना एप्रिल ते जून 2020-21 या कालावधीतील रेल्वे, रस्ते, हवाई आणि जल वाहतूक इत्यादी, वाहतुकीच्या क्षेत्रासह दळणवळण, बँकिंग आणि विमा यासारख्या प्रमुख क्षेत्रांची कामगिरी विचारात घेतली आहे. बीएसई / एनएसईकडून प्राप्त आकडेवारीच्या आधारे एप्रिल ते जून 2020-21 दरम्यान कॉर्पोरेट क्षेत्राची कामगिरी लक्षात घेतली गेली आहे.

अंदाजानुसार वापरलेल्या मुख्य निर्देशकांमधील टक्केवारी बदल खाली सूचीबद्ध आहेत:

2020-21 आर्थिक वर्षातील जुलै 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या खात्यांचा मासिक आढावा

जून 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या मासिक खात्यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

याची ठळक वैशिष्ट्ये: पुढीलप्रमाणे –

केंद्र सरकारला  जुलै 2020 पर्यंत 2,32,860  कोटी रुपये (2020-21  या आर्थिक वर्षाच्या एकूण प्राप्तीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या  (बीई) 10.4%) मिळाले असून यात 2,02,788 कोटी रुपये कर महसूल (नेट टू सेंटर), 24,614 कोटी रुपये बिगर कर  महसूल आणि 5,458 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवल यांचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवल प्राप्तीमध्ये  कर्ज वसुली (5,455 कोटी रुपये) आणि निर्गुंतवणूक (3  कोटी रुपये ) समाविष्ट आहेत.

केंद्र सरकारकडून करातील वाटा म्हणून 1,76,009  कोटी रुपये राज्य सरकारांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा वाटा 23,903 कोटी रुपयांनी कमी आहे.

केंद्र सरकारचा एकूण खर्च 10,54,209  कोटी रुपये आहे (संबंधित बीई 2020-21 च्या  34.65% ), यापैकी 9,42,360  कोटी रुपये महसूल खात्याचे आणि  1,11,849  कोटी रुपये भांडवली खात्याचे आहे. एकूण महसूल खर्चापैकी,1,98,584  कोटी रुपये व्याज देयकांवर आणि 1,04,638  कोटी रुपये प्रमुख अनुदानांवर खर्च झाला आहे.

Exit mobile version