Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात कोरोना उपचाराधीन रुग्णसंख्येचा उतरता आलेख

सलग 41 व्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

आणखी एका महत्वाच्या घडामोडीत, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने काल 29 कोटीचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 39,49,630 सत्रांद्वारे 29,46,39,511 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 54,24,374 मात्रा देण्यात आल्या.

 

यामध्ये समावेश आहे-

 

HCWs 1st Dose 1,01,45,382
2nd Dose 71,14,021
FLWs 1st Dose 1,72,70,889
2nd Dose 91,37,511
Age Group 18-44 years 1st Dose 6,59,41,855
2nd Dose 14,28,117
Age Group 45-59 years 1st Dose 8,28,91,130
2nd Dose 1,31,57,562
Over 60 years 1st Dose 6,56,45,248
2nd Dose 2,19,07,796
Total 29,46,39,511

 

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. गेल्या 24 तासात 50,848 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 16 व्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.  केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिपाक आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0016AIA.jpg

देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. आज उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,43,194 होती. 82 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020R17.jpg

कोविड-19 मधून अधिकाधिक  रुग्ण बरे होत असल्याने सलग 41 व्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 68,817 रुग्ण कोरोना मुक्त झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003YGJZ.jpg

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 2,89,94,855 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 96.56% असून याचा आलेख चढता आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004G02Z.jpg

देशाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ होत असून गेल्या 24 तासात 19,01,056 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 39.59 कोटी (39,59,73,198) चाचण्या करण्यात आल्या.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005HEAM.jpg

देशात चाचण्या वाढवण्यात आल्या असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सातत्याने खाली येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 3.12% आणि आज दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.67% आहे. सलग 16 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version