ऑगस्ट 2020 मध्ये डीएपी चे दर घसरले

प्रभावी किंमत देखरेख  यंत्रणा शेतकऱ्यांना स्वस्त किंमतीमध्ये खत मिळवून देण्यास मदत करीत आहे: गौडा

केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले की,  रसायन व खते मंत्रालयाच्या उर्वरक विभागाने पोषक तत्वावर आधारित अनुदान (एनबीएस) योजनेअंतर्गत सर्व खतांसाठी उत्पादन खर्चाची / आयातीची संपूर्ण तपासणी सुरु केली आहे.

विभागाच्या प्रभावी देखरेख यंत्रणेच्या या उपक्रमाबद्दल माहिती देताना गौडा यांनी सांगितले की, खत कंपन्यांनी आता ऐच्छिक स्वयं-नियामक यंत्रणा स्वीकारली असून रेजसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस – आरएलएनजीच्या आंतरराष्ट्रीय बाजाराच्या किंमतीमध्ये होणाऱ्या घसरणीचा फायदा उत्पादक कंपन्यां शेतकऱ्यांना देत आहेत.

डायमोनियम फॉस्फेट (DAP), अमोनियम सल्फेट आणि अन्य पी अँड के (फॉस्फेटिक आणि पोटॅसिक)खतांच्या उत्पादक कंपन्यांकडून पी अँड के खतांच्या उत्पादनासाठी आरएलएनजीचा उपयोग फीडस्टॉक म्हणून केला जातो

ऑगस्ट 2020 मध्ये डीएपी चे दर ऑगस्ट 2019 च्या प्रती एमटी 26396 रुपयांच्या तुलनेत कमी होऊन 24626 रुपये झाले अशी माहिती गौडा यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे, 18 एनपीके खत सूत्रीकरणापैकी, ऑगस्ट 2020 मध्ये 15 च्या  सुत्रीकरणाच्या एमआरपी मध्ये ऑगस्ट 2019 च्या तुलनेत घट झाली आहे. अमोनियम सल्फेटच्या 2019 मधील प्रति एमटी 13213 रुपयांमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये घट होऊन टी 13149 रुपये झाली .

देशातील शेतकर्‍याला योग्य वेळी योग्य किंमतीत खते उपलब्ध करुन देण्यासाठी खत विभाग वचनबद्ध आहे.