Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

Video : नाशिकच्या सटाणा तालुक्यात गारपिटीने नुकसान

निफाड (दीपक श्रीवास्तव ) दि २४ :  दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील केरसाने या गावामध्ये तुफानी गारपिट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे या घटनेमुळे शेतकरी वर्ग हादरून गेलेला असून घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने केरसाने येथे धाव घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ

बागलाण तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह झालेल्या गारपीटीमुळे सुमारे ५ हजार हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले सर्वाधिक कांदा पिक जमीनदोस्त झाले.नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गेलेल्या आमदार दिलीप बोरसे यांना शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. काही काळ शेतकऱ्यांनी त्यांना बंधीस्त करून ठेवल्याची घटणा केरसाने येथे घडली.

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवार पासून जोरदार पाऊस होत आहे काल मंगळवारी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला.निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तळवाडे दिगर,किकवारी,केरसाने ,दसाने,परिसरात वादळी वारा,विजांचा कडकडाट व जोरदार गारपीट झाल्याने कांदा,फळबाग, भाजीपाला,गहू, हरबरा,पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

गारपीटीची सर्वाधिक झळ का़ंद्यासह भाजीपाला पिकांना बसली.पश्चिम पट्ट्यात ९०% कांदा जमीनदोस्त झाला सुमारे ४१०० हेक्टर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले.

मोसम खो-यात कांदा,टोमॅटो व भाजीपाला पिकांचे ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वा-याचा फटका नामपुर सह बिलपुरी,बहीराणे,महड,गोराणे,फोपीर,आसखेडा,चिराई,राजपुर पांडे,खामलोन, श्रीपुरवडे,द्याने,वरचे टेंभे,जायखेडा,खडकीपाडा,लखमापुर,तळवाडे दिगर,दसवेल आदी गावांना बसला आहे.

तालुक्यातील मोसम,करंजाडी खो-यासह बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या ४ दिवसांपासून वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह गारपीटीने थैमान घातले आहे.रात्रीचा दिवस करून कष्टाने फुलवलेली कांदा,टोमॅटो,गहू,हरभरा,भाजीपाला आदी शेती क्षेत्राचे नुकसान डोळ्यासमोर होत असल्याने शेतकरी कावराबावरा झाला आहे.

मोठ्या कष्टाने कांदा क्षेत्राला रात्रीचे बारे देऊन उत्पादन जास्त मिळविण्याचे स्वप्न शेतकरी बघत होता अवकाळीने शेतक-यांच्या स्वप्नांवर पाणी फिरविले.विहीरांना पाणी असतांना विज वितरण कंपनीने शेतक-यांच्या विजजोडण्या तोडून मोठा घाला घातला त्यात अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांना रक्त रंजीत करून सोडल्याच्या भावना  शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version