महाराष्ट्रात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येत वाढ

देशात आज सक्रीय रुग्ण संख्या 1,51,708 असून ही संख्या एकूण पॉझीटिव्ह रुग्णांच्या 1.37% आहे. महाराष्ट्र,केरळ,पंजाब,मध्य प्रदेश,तामिळनाडू,गुजरात आणि छत्तीसगड या राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून आल्याने ही संख्या झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002LAW2.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0033MS4.jpg

गेल्या 24 तासात 16,738 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 89.57% रुग्ण 7 राज्यातले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0015OT1.jpg

महाराष्ट्रात सर्वात  जास्त म्हणजे 8,807, केरळ मध्ये 4,106 तर पंजाब मध्ये 558 नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005SWV0.jpg

केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)  मध्ये केंद्र सरकारने उच्च स्तरीय बहु शाखीय पथके तैनात केली असून ही पथके या राज्यांमध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांची कारणे शोधून कोविड -19 नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागाला सहाय्य करणार आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006PYR7.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007EXU6.jpg

आज सकाळी 7 वाजेपर्यंत 2,64,315 सत्राद्वारे  1,26,71,163 लाभार्थींचे लसीकरण झाले.  यामध्ये 65,47,831  आरोग्य कर्मचाऱ्यांचा ( पहिली मात्रा ) 16,16,348 आरोग्य कर्मचारी ( दुसरी मात्रा ) आणि  45,06,984 आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी ( पहिली मात्रा ) यांचा समावेश आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008398N.jpg

कोरोनातून बरे झालेल्यांची भारतातली एकूण संख्या आज 1,07,38,501 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज  97.21% आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर सातत्याने वाढत असून हे आज 10,586,793 होते. गेल्या 24 तासात 11,799 जण कोरोनातून बरे झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image009N03B.jpg