दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.59% पर्यंत घट

देशात आतापर्यंत 19 कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत भारताने लसींच्या 19 कोटीपेक्षा जास्त (19,18,79,503) मात्रा देत लसीकरण अभियानामध्ये आज नवा टप्पा गाठला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 27,53,883 सत्रांद्वारे 19,18,79,503 मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये 97,24,339 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा ), 66,80,968 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,47,91,600 फ्रंट लाईन कर्मचारी (पहिली मात्रा), 82,85,253 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा), 18-44 वयोगटामधले 86,04,498 लाभार्थी (पहिली मात्रा) 45 ते 60 वयोगटातल्या 5,98,35,256 (पहिली मात्रा ), आणि 95,80,860 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षावरील 5,62,45,627 लाभार्थी (पहिली मात्रा ), 1,81,31,102  (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

 

HCWs 1st Dose 97,24,339
2nd Dose 66,80,968
FLWs 1st Dose 1,47,91,600
2nd Dose 82,85,253
Age Group 18-44 years 1st Dose 86,04,498
Age Group 45 to 60 years 1st Dose 5,98,35,256
2nd Dose 95,80,860
Over 60 years 1st Dose 5,62,45,627
2nd Dose 1,81,31,102
  Total 19,18,79,503

 

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.32% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001Y85V.jpg

गेल्या 24 तासात 20.61 लाखापेक्षा जास्त चाचण्या करत भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम केला आहे.

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.59% पर्यंत घट झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0025BA8.jpg

भारतात सलग आठव्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3,57,295 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 2,27,12,735 झाली. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 87.25% झाला आहे.

नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 74.55%  हे दहा राज्यातले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003AM7T.jpg

आणखी एका सकारात्मक घडामोडीत सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या 3 लाखापेक्षा कमी नोंदवली गेली.

गेल्या 24 तासात 2,59,551 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 76.66% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत.

तामिळनाडूत सर्वात जास्त म्हणजे 35,579 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळमध्ये 30,491 नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0043L64.jpg

भारतातली एकूण उपचाराधीन रुग्ण संख्या आज 30,27,925 पर्यंत घटली आहे.

गेल्या 24 तासात  उपचाराधीन रुग्ण संख्येत 1,01,953 ची घट झाली आहे.

देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी 69.47% रुग्ण 8  राज्यात आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005FH3H.jpg