बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 90 लाखांपेक्षा अधिक

सलग सातव्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या नवीन बाधित रुग्णांपेक्षा जास्त

देशात उपचार सुरु असलेल्या कोविड रुग्णांचे प्रमाण कालच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 4.44 टक्क्यांवरून आज 4.35 टक्क्यांपर्यंत खाली घसरले.

मागील 7 दिवसांचा कल कायम ठेवत भारतात गेल्या  24 तासात नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक नोंदवली गेली.

नवीन सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचा कल कायम राहिल्यामुळे देशातील उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत सातत्याने घट होत असून आज ही संख्या 4,16,082 इतकी आहे.

गेल्या  24 तासांमध्ये देशात 36,595 नवे रुग्ण आढळले तर  42,916 रुग्ण बरे झाले. गेल्या 24 तासांत बरे झालेले रुग्ण आणि नवीन बाधित रुग्ण यांच्यातील फरक 6,321 इतका असून यामुळे एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 6,861 ने घट झाली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001Z3UU.jpg

जगातील प्रति दहालाख लोकसंख्येच्या सर्वात कमी म्हणजेच (6,936) रुग्णसंख्या भारताने नोंदवली असून पश्चिम गोलार्धातील इतर देशांपेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002WPCW.jpg

बरे झालेल्या रुग्णांचा दर आज 94.2% वर पोहचला आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 90,16,289 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि नवीन बाधित रुग्ण यांच्यातील दरी निरंतर वाढत आहे आणि सध्या ते 86,00,207 इतके आहे.

बरे झालेल्या रुग्णांपैकी 80.19 टक्के रुग्ण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्रात काल सर्वाधिक 8,066 रुग्ण कोविड मुक्त झाले असून केरळमध्ये 5,590 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत 4,834  रुग्ण बरे झाले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003PPU4.jpg

गेल्या 24 तासांमध्ये देशात आढळलेल्या  नवीन रुग्णांपैकी  75.76 टक्के रुग्ण  दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये केरळमध्ये 5,376 नव्या रुग्णांची नोंद झाली, त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,182 तर  दिल्लीमध्ये 3,734 नवीन रूग्ण आढळले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004PTV0.jpg

गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 या महामारीमुळे 540 जणांचा मृत्यू झाला. यापैकी  77.78  टक्के मृत्यू दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 115 मृत्यूची नोंद झाली असून  हे प्रमाण 21.29 टक्के आहे. दिल्लीमध्ये 82 तर पश्चिम बंगालमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005ABIP.jpg

जागतिक स्तरावर तुलना केली तर भारत प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये (101) इतक्या सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण  असलेल्या देशांपैकी एक आहे.