भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 48.93 कोटींहून अधिक मात्रांचा टप्पा पार केला

भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी काल ,48.93 कोटींचा टप्पा ओलांडला.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 57,21,937  सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 48,93,42,295 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 37,55,115  मात्रा देण्यात आल्या.

या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

देशात 21 जून 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

HCWs 1st Dose 1,03,21,218
2nd Dose 79,16,997
FLWs 1st Dose 1,80,12,481
2nd Dose 1,15,34,779
Age Group 18-44 years 1st Dose 16,64,37,738
2nd Dose 1,02,76,584
Age Group 45-59 years 1st Dose 10,90,91,506
2nd Dose 4,09,44,600
Over 60 years 1st Dose 7,72,63,332
2nd Dose 3,75,43,060
Total 48,93,42,295

देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,09,74,748 रुग्ण यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर 97.37% झाला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत, 42,982  नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग एकोणचाळीस दिवस 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,11,076  इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.29% इतके आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,64,030 चाचण्या करण्यात आल्या.  आतापर्यंत देशात 47 कोटी 48  लाखांहून अधिक (47,48,93,363 ) चाचण्या करण्यात आल्या.

 

देशभरात एकीकडे कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.37% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.58 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर  सलग 59  दिवस  5%  हून कमी राहिला आहे.

***