गेल्या 24 तासांच्या कालावधीत कोविड प्रतिबंधक लसीचे 36 लाख 70 हजारहून जास्त डोस देऊन भारताने लसीकरण मोहिमेत एका दिवसात सर्वात जास्त डोस देण्याचा उच्चांक गाठला आहे.
लसीकरण मोहिमेच्या कालच्या 76 व्या दिवशी (1 एप्रिल 2021) लसीचे 36,71,242 डोस देण्यात आले. यापैकी, 33,65,597 लाभार्थ्यांना 51,215 सत्रांच्या माध्यमातून लसीचा पहिला डोस तर 3,05,645 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
साकल्याने एकूण आकडेवारीचा विचार करता, आतापर्यंत, देशात, 11,37,456 सत्रांच्या आयोजनाद्वारे कोविड लसीचे 6.87 पेक्षा जास्त (6,87,89,138) मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 83,06,269 आरोग्य सेवा कर्मचारी(पहिला डोस), 52,84,564 आरोग्य सेवा कर्मचारी(दुसरा डोस), 93,53,021 आघाडीवरील कर्मचारी (पहिला डोस), 40,97,634 आघाडीवरील कर्मचारी (दुसरा डोस), 45 वर्षांपेक्षा जास्त वय आणि सह्व्याधी असलेले 97,83,615 लाभार्थी (पहिला डोस), 39,401 लाभार्थी (दुसरा डोस) आणि 60 वर्षांहून जास्त वय असलेले 3,17,05,893 लाभार्थी (पहिला डोस)तसेच 2,18,741 लाभार्थी (दुसरा डोस) यांचा समावेश आहे.
आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रापैकी 59.58% मात्रा देशातल्या आठ राज्यांमध्ये देण्यात आले. भारतात देण्यात आलेल्या एकूण मात्रापैकी 9.48% मात्रा एकट्या महाराष्ट्रात देण्यात आल्या .
देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू,केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांमध्ये रोज सापडणाऱ्या नव्य कोविड ग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 81.25% रुग्ण या आठ राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासांत,81,466 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली.
एका दिवसात सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 43,183 रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 4,617 तर कर्नाटकात 4,234 नवे रुग्ण सापडले.
Date: 1st April,2021 | |||||||||
HCWs | FLWs | 45 to < 60 years with Co-morbidities | Over 60 years | Total Achievement | |||||
1stDose | 2ndDose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2ndDose | 1stDose | 2ndDose | 1stDose | 2ndDose |
45,976 | 33,860 | 1,78,850 | 1,51,838 | 19,46,948 | 21,552 | 11,93,823 | 98,395 | 33,65,597 | 3,05,645 |
खाली दर्शविल्याप्रमाणे, 10 राज्यांमध्ये रुग्णसंख्येत सतत मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे.
भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 6,14,696 वर पोहोचली आहे.हे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या 5% आहे. गेल्या 24 तासांत, एकूण सक्रीय रुग्णसंख्या 30,641 ने कमी झाली.
देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 77.91% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि पंजाब या पाच राज्यात आहेत. एकूण सक्रीय रुग्णांपैकी सुमारे 60% (59.84%) रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत.
HCWs | FLWs | 45 to <60 years with Co-morbidities | Over 60 years |
Total |
||||
1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd dose | 1st Dose | 2nd Dose | |
83,06,269 | 52,84,564 | 93,53,021 | 40,97,634 | 97,83,615 | 39,401 | 3,17,05,893 | 2,18,741 | 6,87,89,138 |
भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या 1,15,25,039 इतकी आहे. राष्ट्रीय रोगमुक्ती दर 93.68% आहे.
गेल्या 24 तासांत 50,356 रुग्ण कोविड मुक्त झाले.
गेल्या 24 तासांत, कोविडमुळे 469 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 83.16% रुग्ण देशाच्या सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 249 कोविड ग्रस्तांचा मृत्यू झाला, तर पंजाबमध्ये एका दिवसात 58 रुग्ण दगावले.
देशातील ओदिशा, लडाख (कें.प्र.), दीव-दमणआणि दादरा-नगर हवेली, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, लक्षद्वीप, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे रुग्ण दगावल्याची नोंद नाही.