एका दिवसात 56,110 रुग्ण बरे होण्याचा विक्रम

भारतात एका दिवसात 7,33,449 चाचण्यांचा विक्रम

गेल्या 24 तासांत 56,110 एवढी आतापर्यंतची एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली. प्रतिबंध धोरणांची यशस्वी अंमलबजावणी, आक्रमक पावलं उचलत केलेल्या व्यापक चाचण्या आणि कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन, या सर्वांचा हा एकत्रित परिणाम आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या योग्य समन्वयामुळे रुग्ण बरे होण्याचे दैनंदिन प्रमाण सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या 15,000 होती, ती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50,000 पेक्षा अधिकवर पोहचली.

WhatsApp Image 2020-08-12 at 11.35.47.jpeg

जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यामुळे आणि गृह अलगीकरण (सौम्य लक्षणे असलेले रुग्ण), यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने 16 लाखांचा टप्पा ओलांडला आहे, त्यांची संख्या आता 16,39,599 एवढी आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने 70.38% हा नवा उच्चांक गाठला आहे.

एकूण रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांची संख्या (6,43,948) म्हणजे केवळ 27.64% आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढून, सुमारे 10 लाख एवढे झाले आहे.

रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 1.98% एवढा आहे.

भारताच्या ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या 24 तासांत 7,33,449 चाचण्यात करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 2.6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर, प्रती दशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या 18,852 वर पोहचली आहे.