देशात एका दिवसात सर्वाधिक 51,706 रुग्ण बरे झाले

रुग्ण बरे होण्याचा दर विक्रमी 67.19 टक्क्यांवर

गेल्या 24 तासांत देशात एका दिवसात सर्वाधिक 51,706 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर विक्रमी 67.19 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 12,82,215 रुग्ण बरे झाले असून ही संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुप्पट आहे.

रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 63.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्राच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” नीतीद्वारे सुरू असलेले कोविड – 19 प्रतिसाद आणि व्यवस्थापन यामुळे ही अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे.

WhatsApp Image 2020-08-05 at 12.25.29.jpeg

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या एकत्रित प्रयत्नांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसह नमुन्यांची वाढती चाचणी यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

WhatsApp Image 2020-08-05 at 12.25.28.jpeg

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सतत वाढ होत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत 7 लाख इतकी झाली आहे. दररोज जास्तीत जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 5,86,244 (काल ही संख्या 5,86,298 इतकी होती) इतकी झाली असून हे रुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत.

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” धोरणाची एकत्रित अंमलबजावणी केल्याने सीएफआर अर्थात कोविड मृत्यू दर जागतिक परिस्थितीच्या तुलनेत कमी असून त्यात सातत्याने घट होत आहे. कोविड मृत्यू दर आज 2.09 टक्के इतका आहे.