मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याच्या स्थिर दरात भारताचे सातत्य कायम
प्रति दिवशी मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होत आहेत, उच्च स्तरावर रुग्ण बरे होण्याचा भारताचा स्थिर दर कायम आहे.
गेल्या 24 तासांत भारतात 93,420 नवे रुग्ण बरे झाले आहेत. याबरोबरच, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 48,49, 584 इतकी झाली आहे.
दररोज रुग्णांच्या बरे होण्यात झालेल्या वाढीसह, रुग्ण बरे होण्याच्या दराने देखील आपला वाढीचा कल कायम ठेवला आहे. सध्या हा 82.14 % वर आहे.
अशाच एकदिवसीय विक्रमी क्रमांकासह एकूण रुग्ण बरे होण्यामध्ये भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखले आहे.
जसे नवी रुग्णांच्या संख्येपेक्षा भारतात रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे, तसेच बरे झालेले रुग्ण संख्या आणि सक्रिय रुग्ण संख्या यामधील अंतर निरंतर वाढतच आहे.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या (48,49,584) सक्रिय रुग्णसंख्येपेक्षा (9,60,969) जवळपास 39 लाखांनी (38,88,615) अधिक आहे.
हे देखील सुनिश्चित केले आहे की, सक्रिय रुग्ण संख्येचा दर हा एकूण बाधित रुग्ण संख्येपैकी केवळ 16.28 % आहे. हे त्याच्या सतत घटत्या मार्गावर कायम आहे.
राष्ट्रीय पातळीवरील आघाडी पाहता, 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील नवीन रुग्ण संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याच्या आकडेवारीची नोंद उच्च आहे.
नवीन रुग्ण संख्येच्या प्रकरणांपैकी 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा सुमारे 73 % इतका आहे.
19,592 एवढे बरे झालेल्या रुग्ण संख्येवर महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे.
हे सातत्याने चालणारे प्रोत्साहनात्मक निकाल `चेस द व्हायरस` (विषाणूंना नष्ट करा) या दृष्टिकोनावर जोरदार लक्ष देऊन टेस्ट ट्रॅक ट्रीट (चाचणी, पाठपुरावा, उपचार) या केंद्राच्या नेतृत्त्वातील कृतीशील आणि मानांकित धोरणामुळे शक्य झाले आहे. देशभरात केल्या गेलेल्या उच्च आणि आक्रमक चाचणी पद्धतींमुळे राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्रारंभिक पातळीवर प्रभावीपणे बाधित रुग्णांना शोधता आले. हे संक्रमण रोखण्यासाठी, संपर्क ओळखण्यासाठी, पाठपुरावा करण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी पूरक आहे.
घर / सुविधा विलगीकरण केंद्र आणि रुग्णालयांमध्ये समान आणि उच्च गुणवत्तेची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी केंद्राने काळजी घेण्याच्या पद्धतींची मानके जारी केली आहेत. नव्याने येत असलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय दाखल्यांवरून वेळोवेळी याच्या श्रेणीतही सुधारणा केली गेली आहे. तांत्रिक, आर्थिक, साहित्य आणि इतर संसाधनांद्वारे राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना सरकार पाठिंबा देत आहे.