सलग 11 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधितांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
कोविड-19 महामारीविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात भारताने आज महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात देशाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 कोटीहून जास्त (1,06,21,235) व्यक्तींना लसीच्या मात्रा दिल्या आहेत. चाचणी, संपर्कशोध, उपचार आणि कोविड-योग्य वर्तणूक यांच्यासह लसीकरण हा महामारीचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी भारत सरकारने आखलेल्या समावेशक धोरणाचा अविभाज्य भाग आहे. देशात कोविड-19 प्रतिबंधक व्यापक आणि वेगवान लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरु झाली.
देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत देशातील एकूण 19 कोटी 60 लाखांहून जास्त नागरिकांनी कोविड -19 प्रतिबंधक लस घेतली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 28,16,725 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 19,60,51,962 मात्रा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 97,60,444 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 67,06,890 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,49,91,357 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिली मात्रा), 83,33,774 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1,06,21,235 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 6,09,11,756 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 98,18,384 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,66,45,457 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,82,62,665 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 66.30% मात्रा देशातील दहा राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.
भारतात सलग 11 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्या बाधितांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असण्याचा कल कायम राहिला. गेल्या 24 तासांत एकूण 3,02,544 व्यक्ती रोगमुक्त झाल्याची नोंद झाली.
देशात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 2,37,28,011 पर्यंत पोहोचली. राष्ट्रीय रोगमुक्ती दरात आणखी सुधारणा होऊन तो 88.69% पर्यंत पोहोचला आहे.
कोविड आजारातून नव्याने बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 72.23% रुग्ण देशाच्या 10 राज्यांमधील आहेत.
आणखी एका सकारात्मक घटनेनुसार, भारतात सलग आठव्या दिवशी एका दिवसात बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्या 3 लाखांहून कमी असल्याची नोंद झाली आहे. रोज नोंद होणारे नवे रुग्ण आणि रोज बरे होणारे रुग्ण यांच्या आकडेवारीतील तफावत कमी होऊन आज 80,229 झाली.
भारतातील दैनंदिन पातळीवर आढळणारे नवे कोविड बाधित आणि या काळात रोगमुक्त होणारे यांच्याबद्दलची माहिती खालील आलेखात दर्शविली आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 2,22,315 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
देशात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या एकूण नव्या रुग्णांपैकी 81.08% देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. तामिळनाडूमध्ये दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 35,483 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यापाठोपाठ, महाराष्ट्रात एका दिवसात 26,672 नवे रुग्ण सापडले.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येचा चढ उतार खालील आलेखात दर्शविला आहे. गेल्या 10 मे रोजी सर्वोच्च पातळीवर असलेली सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होत आहे.
भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या गेल्या 24 तासांत 84,683 ने कमी झाली आहे. हे प्रमाण देशात आतापर्यंत सापडलेल्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या आता 10.17% इतके झाले आहे.
भारतात नोंद झालेल्या एकूण सक्रीय रुग्णांपैकी 71.62% रुग्ण देशाच्या 8 राज्यांतील आहेत.
देशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत एकूण 19,28,127 चाचण्या करण्यात आल्या, संसर्गाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 33,05,36,064 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण कोविड पॉसिटिव्हिटी दर आज 8.09% इतका आहे. साप्ताहिक कोविड पॉसिटिव्हिटी दरात देखील घसरण होऊन तो 12.66% झाला आहे.
राष्ट्रीय मृत्युदर सध्या 1.14% आहे.
गेल्या 24 तासांत, कोविडमुळे 4,454 रुग्णांचा मृत्यू झाला.
गेल्या 24 तासांत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 79.52% मृत्यू देशाच्या दहा राज्यांत झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 1,320 कोविड ग्रस्तांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ कर्नाटकात एका दिवसात 624 रुग्ण मृत्युमुखी पडले.
देशाच्या 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी (1.14%) राहिला आहे.
तर, 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.