Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोविड मृत्यू दरात घट होऊन तो 1.95 टक्के

दिवसाला 10 लाख चाचण्या करण्याच्या उद्देशाने चाचणी सुविधा सतत वाढविण्याचा परिणाम म्हणून, भारताने एकाच दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत 8,48,728 चाचण्या करण्यात आल्या असून यामुळे एकूण चाचण्यांची संख्या 2,76,94,416 इतकी झाली आहे.

डब्ल्यूएचओने “कोविड – 19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष” यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये संशयित रुग्णांसंदर्भात लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. देशाला दर दशलक्ष लोकसंख्येमागे दररोज 140 चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

केंद्राचे प्रयत्न आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राष्ट्रीय स्तरावर दर दशलक्ष लोकसंख्येमागे दिवसाला सरासरी 603 चाचण्या होत आहे. 34 राज्य/केंद्रशासित प्रदेशांना हा टप्पा गाठला आहे. इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना रुग्ण संख्येनुसार चाचणी क्षमता वाढवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Image

संपूर्ण देशभरात डायग्नोस्टिक लॅबचे सतत विस्तारित असणारे जाळे, “टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट” योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्य घटक आहे. देशात आजवर 1451 प्रयोगशाळा असून यामध्ये सरकारी 958 आणि 493 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

जास्तीत जास्त चाचण्यांची यशस्वी अंमलबजावणी, व्यापक शोध घेणे आणि उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचं दर सुधारून 71.17 टक्के इतका झाला आहे. एकूण 17.5 लाखांहून अधिक (17,51,555) कोविड – 19 रुग्ण बरे झाले आहेत.

सक्रिय रुग्णांपेक्षा (6,61,595) बरे झालेले रुग्ण (1,089,960) 11 लाखांहून अधिक आहेत.

प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनामुळे कोविड रूग्णांच्या मृत्युदरात घट झाली असून तो आज 1.95 टक्के आहे.

Exit mobile version