देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासात कोविडमुळे मृत्यू झाल्याची एकही नोंद नाही
भारतात देण्यात आलेल्या एकूण लसीकरण मात्रांची संख्या 13.83 कोटींहून जास्त
देशात सुरु असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशातील 13 कोटी 83 लाखांहून अधिक व्यक्तींनी लस घेतली आहे.
लसीकरण मोहिमेतील सुरुवातीपासूनची आकडेवारी लक्षात घेता, आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 19, 80,105 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 13, 83,79,832 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 92,68,027 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 59,51,076 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,18,51,655 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 61,94,851 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाचे 4,91,45,265 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 71,65,338 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 4,66,71,540 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 21,32,080 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
HCWs | FLWs | Age Group 45 to 60 years | Over 60 years |
Total |
||||
1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | |
92,68,027 | 59,51,076 | 1,18,51,655 | 61,94,851 | 4,66,71,540 | 21,32,080 | 4,91,45,265 | 71,65,338 | 13,83,79,832 |
देशात आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 58.92% मात्रा आठ राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.
गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 29 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण मोहिमेच्या 98 व्या दिवशी, (21 एप्रिल 2021 रोजी) कोविड प्रतिबंधक लसीच्या 29,01,412 मात्रा देण्यात आल्या. एकूण 26,927 लसीकरण सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून 18,63,024 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 10,38,388 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
Date: 23rd April,2021 (Day-98) | |||||||||
HCWs | FLWs | 45 to 60 years | Over 60 years | Total Achievement | |||||
1stDose | 2ndDose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2ndDose |
25,663 | 46,337 | 1,19,696 | 1,17,591 | 11,07,210 | 2,30,784 | 6,10,455 | 6,43,676 | 18,63,024 | 10,38,388 |
भारतात आतापर्यंत कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आजमितीला 1,38,67,997 इतकी आहे तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.49% आहे.
गेल्या 24 तासांत 2,19,838 रुग्ण कोविड मधून बरे झाले अशी नोंद झाली आहे.
देशात कोविड मधून बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 82.94% रुग्ण 10 राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासांत, देशात 3,46,786 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
देशातील नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 74.15% रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमधील आहेत.
महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 66,836 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ, उत्तर प्रदेशात एका दिवसात 36,605 आणि केरळमध्ये 28,447 नवे रुग्ण सापडले.
खाली दाखविल्याप्रमाणे, देशातील 12 राज्यांमध्ये प्रतिदिन सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ होत जाण्याचा कल कायम आहे.
भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 25,52,940 इतकी झाली आहे. आता हे प्रमाण देशात सापडलेल्या एकूण कोविड रुग्णसंख्येच्या 15.37% इतके झाले आहे. गेल्या 24 तासांत, देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,24,324 ने कमी झाली.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत नोंद झालेल्या कोविड रुग्णांच्या संख्येतील वाढीची स्थिती दर्शवितो.
देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 66.66% रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक,राजस्थान, गुजरात आणि केरळ या सात राज्यात एकवटलेले आहेत.
राष्ट्रीय मृत्युदर सतत कमी होत असून सध्या तो 1.14% इतका आहे.
गेल्या 24 तासांत, कोविडमुळे देशात 2,624 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 82.28% रुग्ण देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 773 कोविड ग्रस्तांचा बळी गेला, तर त्यापाठोपाठ दिल्ली मध्ये एका दिवसात 348 रुग्ण मृत्युमुखी पडले.
देशातील लडाख (कें.प्र.), दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, लक्षद्वीप, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे रुग्ण दगावल्याची एकही नोंद झालेली नाही.