Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात कोविड रोगमुक्तीचा दर सध्या 97.38%

corona vaccination

देशात गेल्या 24 तासांत 44,230 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 45 कोटी 60 लाखांचा आकडा पार केला. आज सकाळी 8  वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 54,50,378 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 45,60,33,754 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 51,83,180 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

HCWs 1st Dose 1,02,98,871
2nd Dose 77,94,788
FLWs 1st Dose 1,79,23,328
2nd Dose 1,11,57,062
Age Group 18-44 years 1st Dose 14,95,34,704
2nd Dose 76,78,805
Age Group 45-59 years 1st Dose 10,37,58,165
2nd Dose 3,75,98,059
Over 60 years 1st Dose 7,46,25,671
2nd Dose 3,56,64,301
Total 45,60,33,754

 

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,07,43,972 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 42,360 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे सकल रोगमुक्ती दर 97.38% झाला आहे.

गेल्या 24 तासांत भारतात, 44,230 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग तेहतीस दिवस, 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,05,155 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.28% इतके आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,16,277 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 46 कोटींहून अधिक (46,46,50,723) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.43% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.44% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सलग 53 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

Exit mobile version