कोविड मृत्यु दरात आणखी घट होत तो आता 2. 28%

सलग चौथ्या दिवशी तीस हजारांवर रुग्ण बरे झाले

केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचा रोख हा अधिकाधिक कोविड चाचण्या करून लवकरात लवकर बाधित रुग्ण शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करून त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून , मृत्युदर सतत कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, प्रभावी प्रतिबंध धोरण आणि अधिकधिक चाचण्यांमुळे रुग्णांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात घसरत असून तो आता 2.28% आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

प्रतिदिन तीस हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा पायंडा सलग चौथ्या दिवशीही कायम असून गेल्या 24 तासात 31 हजार 991 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 9,17,567  झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 64 % आहे.

घटलेला मृत्युदर आणि बरे होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता सक्रिय रुग्णांच्या (4,85,114) संख्ये पेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 4,32,453 ने जास्त आहे. घरी राहणाऱ्या तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सतत पुरवली जात आहे.