देशाच्या कोविड मृत्यू दर 2.11% वर खालावला

पुणे येथील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी

भारत सरकारच्या औषध नियंत्रकांनी पुण्यातील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला आँक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेका सोबत  देशात कोविड विरोधी लस बनविण्याच्या (COVIDSHIELD) क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या आणि  तिसऱ्या  टप्प्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे कोविड विरोधी लस बनविण्याच्या कार्याला वेग येईल.

दरम्यान भारताच्या रुग्ण मृत्यू दरात आणखी घट झाली असून जगाच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे. आज तो 2.11% इतका झाला आहे. कोविड व्यवस्थापनाच्या ‘टेस्ट,  ट्रॅक अँड ट्रीट’  या उत्तम आणि परीणामकारक कार्यवाहीमुळे देशात हा दर गाठणे शक्य झाले आहे.

कोविड व्यवस्थापनाच्या धोरणाचे लक्ष्य त्वरित शोध, विलगीकरण,आणि रुग्णांचे सुरळीत व्यवस्थापन आणि अधिक धोकादायक लोकसंख्येच्या विभागात वैद्यकीय  कर्मचाऱ्यांची सेवा यामुळे देशात रुग्ण बरे होण्याच्या दरातील वाढ शक्य झाली आहे. गेल्या 24 तासात 40,574रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोविड  रुग्णांची संख्या 11,86203 इतकी झाली असून बरे होण्याचा दर 65.77% इतका झाला आहे.

दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील फरक 6 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या तो 6,06,846 इतका आहे.  सध्या   5,79357 एवढे  रुग्ण उपचाराधिन आहेत.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने परदेशातून परतणाऱ्या नागरीकांसाठी 24मे 2020 रोज जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांची फेररचना केली आहे. दि.8 ऑगस्ट 2020 रात्री एक वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.