Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील सक्रीय कोविड रुग्णसंख्येत सातत्याने घट

सलग सहाव्या दिवशी उपचाराधीन रुग्णसंख्या सहा लाखांहून कमी रोगमुक्तीच्या दराने 92% चा टप्पा ओलांडला

कोविड-19 मधून बरे होणाऱ्यांची दरदिवशी वाढती संख्या  आणि मृत्यूदरातील घट यामुळे भारताची कोविड रुग्णसंख्येतील घट नोंदवण्याकडे स्थिर वाटचाल सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी, आज उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाखांहून कमी नोंदली गेली.

भारतात आज  5,33,787  जण बरे झाल्याचे नोंदवले गेले.

देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेले (Active) रुग्ण फक्त 6.42% एवढेच आहेत,

16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील बाधित रूग्णांची सरासरी राष्ट्रीय सरासरीहून कमी आहे.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.22.47 AM.jpeg

रोगमुक्तांच्या एकूण संख्येने आज 76.5 लाखांचा आकडा (76,56,478) पार केला.  बरे होणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत आहे. रोगमुक्तीच्या राष्ट्रीय स्तरावरील दरानेसुद्धा 92 (92.09%) टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.

संपूर्ण देशात गेल्या 24 तासांमध्ये 53,285 जणांना बरे होऊन सुट्टी मिळाली तर 46,253. ही नवी रूग्णसंख्या नोंदवली गेली.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.04 AM.jpeg

17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात रोगमुक्तीचा दर राष्ट्रीय स्तरावरील दरापेक्षा जास्त.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.14 AM.jpeg

देशाच्या निदान चाचणी क्षमतेत जलद वाढ होत आहे.  एकूण 11.3 कोटी (11,29,98,959) चाचण्या आज झाल्या आणि गेल्या 24 तासात 12,09,609  चाचण्या झाल्या.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.13 AM.jpeg

16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील चाचण्यांची संख्या राष्ट्रीय सरासरीहून जास्त.

नवीन रुग्णमुक्तांपैकी 80%  केसेस 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.03 AM.jpeg

केरळ व कर्नाटकात दैंनदिन रोगमुक्तीत सर्वाधिक म्हणजे 8000 बरे झाले तर, तर कर्नाटकात 7000 पेक्षा जास्त जण बरे झाले. नवीन बाधितांपैकी 76% बाधित हे 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळ व दिल्ली दोन्हीकडे दैनंदिन 6000 पेक्षा जास्त नवीन केसेस आढळल्या, तर त्याखालोखाल महाराष्ट्रात 4000 इतके नवीन रुग्ण आढळले.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.01 AM.jpeg

गेल्या 24 तासात 514 मृत्यू नोंदवले गेले. यापैकी 80% मृत्यू10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात नोंदवले गेले. गेल्या 24 तासात दैंनदिन मृत्यूसंख्येची नोंद महाराष्ट्रात सर्वाधिक झाली.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.02 AM.jpeg

भारताचा मृत्यूदर 1.49 % वर आला आहे.

16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील मृत्यूंची संख्या राष्ट्रीय सरासरीहून कमी नोंदवली गेली.

WhatsApp Image 2020-11-04 at 10.43.09 AM.jpeg

Exit mobile version