गेल्या 24 तासात 20 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड मृत्यूची नोंद नाही
भारताच्या कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा संचयी आकडा 1.34 कोटीच्या पुढे गेला आहे.
आज सकाळी सात वाजता मिळालेल्या अहवालानुसार, 2,78,915 सत्रांमध्ये 1,34,72,643 एकूण लसीकरण झाले आहे. यामध्ये 66,21,418 इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची पहिली मात्रा, 20,32,994 आरोग्य कर्माचाऱ्यांना लसीकरणाची दुसरी मात्रा आणि आघाडीवर काम करणाऱ्या 48,18,231 कर्मचाऱ्यांना लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात आली.
लसीकरणाची पहिली मात्रा घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांसाठी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला 13 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारंभ झाला होता. आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 2 फेब्रुवारी 2021 रोजी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
S.
No. |
State/UT |
Beneficiaries vaccinated | ||
1st Dose | 2nd Dose | Total Doses | ||
1 | A & N Islands | 6,034 | 2,385 | 8,419 |
2 | Andhra Pradesh | 5,03,858 | 1,30,591 | 6,34,449 |
3 | Arunachal Pradesh | 24,193 | 6,331 | 30,524 |
4 | Assam | 1,89,569 | 21,468 | 2,11,037 |
5 | Bihar | 5,48,175 | 76,211 | 6,24,386 |
6 | Chandigarh | 18,894 | 1,568 | 20,462 |
7 | Chhattisgarh | 3,73,644 | 48,347 | 4,21,991 |
8 | Dadra & Nagar Haveli | 5,252 | 337 | 5,589 |
9 | Daman & Diu | 2,151 | 254 | 2,405 |
10 | Delhi | 3,62,072 | 34,567 | 3,96,639 |
11 | Goa | 17,875 | 1,918 | 19,793 |
12 | Gujarat | 8,32,737 | 1,25,357 | 9,58,094 |
13 | Haryana | 2,20,672 | 68,361 | 2,89,033 |
14 | Himachal Pradesh | 1,00,723 | 17,041 | 1,17,764 |
15 | Jammu & Kashmir | 2,30,494 | 13,391 | 2,43,885 |
16 | Jharkhand | 2,80,339 | 19,440 | 2,99,779 |
17 | Karnataka | 5,96,274 | 1,92,934 | 7,89,208 |
18 | Kerala | 4,41,597 | 88,877 | 5,30,474 |
19 | Ladakh | 8,753 | 748 | 9,501 |
20 | Lakshadweep | 2,353 | 688 | 3,041 |
21 | Madhya Pradesh | 6,49,377 | 1,31,088 | 7,80,465 |
22 | Maharashtra | 10,10,322 | 1,31,968 | 11,42,290 |
23 | Manipur | 48,938 | 2,239 | 51,177 |
24 | Meghalaya | 28,860 | 1,350 | 30,210 |
25 | Mizoram | 20,955 | 4,876 | 25,831 |
26 | Nagaland | 28,691 | 5,425 | 34,116 |
27 | Odisha | 4,58,368 | 1,54,434 | 6,12,802 |
28 | Puducherry | 9,455 | 1,024 | 10,479 |
29 | Punjab | 1,49,029 | 32,863 | 1,81,892 |
30 | Rajasthan | 7,97,900 | 1,52,486 | 9,50,386 |
31 | Sikkim | 16,630 | 1,228 | 17,858 |
32 | Tamil Nadu | 3,78,411 | 50,844 | 4,29,255 |
33 | Telangana | 2,84,058 | 1,14,020 | 3,98,078 |
34 | Tripura | 88,487 | 19,527 | 1,08,014 |
35 | Uttar Pradesh | 11,67,285 | 2,03,454 | 13,70,739 |
36 | Uttarakhand | 1,40,671 | 14,323 | 1,54,994 |
37 | West Bengal | 8,72,999 | 1,20,107 | 9,93,106 |
38 | Miscellaneous | 5,23,554 | 40,924 | 5,64,478 |
Total | 1,14,39,649 | 20,32,994 | 1,34,72,643 |
लसीकरण मोहिमेच्या 41 व्या दिवशी (25 फेब्रुवारी 2021) 8,01,480 लाभार्थ्यांना लसीकरणाची मात्रा देण्यात आली. त्यापैकी 3,84,834 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या लाभार्थ्यांना 14,600 सत्रांमधून पहिली मात्रा देण्यात आली आणि 4,16,646 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची दुसरी मात्रा देण्यात आली.
लसीकरणाच्या एकूण 1,34,72,643 मात्रांपैकी 1,14,39,649 मात्रांचा (आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी असलेले कर्मचारी) यांना पहिली मात्रा देण्यात आली आहे आणि एकूण 20,32,994 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची दुसरी मात्रा मिळाली आहे.
नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोंदणी असलेल्यांपैकी 60 टक्क्यांपेक्षा कमी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे.
यामध्ये अरुणाचलप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, लडाख, छत्तीसगड, नागालँड, पंजाब आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे.
13 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी अग्रभागी काम करणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्क्यांहून कमी जणांचे लसीकरण केले आहे.
यामध्ये चंदीगड, नागालँड, तेलंगणा, मिझोरम, पंजाब, गोवा, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, मणिपूर, आसाम, अंदमान आणि निकोबार बेटे, मेघालय आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे.
भारतातील एकूण बाधित रुग्णांपैकी सक्रिय रुग्णसंख्या 1,55,986 इतकी असून ही संख्या 1.41 टक्के इतकी आहे. काही राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील दररोजच्या नवीन रुग्णसंख्येमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मुख्यत्त्वे जबाबदार आहे.
ते पुढील प्रमाणे आहेत – जम्मू आणि काश्मिर (820) आंध्रप्रदेश (611), ओडिशा (609), गोवा (531), उत्तराखंड (491), बिहार (478), झारखंड (467), चंदीगड (279), हिमाचल प्रदेश (244), पुद्दुचेरी (196), लक्षद्वीप (86), लडाख (56), सिक्कीम (43), मणिपूर (40), त्रिपुरा (32), मिझोरम (27), मेघालय (20), नागालँड (13), दीव आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली (5), अरुणाचलप्रदेश (3) आणि अंदमान आणि निकोबार बेटे (2).
गेल्या 24 तासांमध्ये 20 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधून कोविड 19 मुळे मृत्यू झाल्याची एकही नोंद नाही.
ते पुढील प्रमाणे आहेत – दिल्ली, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मिर, आंध्रप्रदेश, झारखंड़, चंदीगड, हिमाचल प्रदेश, आसाम, लडाख, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, दीव आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटे.
महाराष्ट्रात रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ दिसत असून ती 4,902 इतकी आहे, तर केरळमध्ये रुग्णसंख्या कमी होत असून ती 989 इतकी नोंदविली गेली आहे.
भारतातील एकूण बरे झालेल्या रुग्णांचा संचयी आकडा आज 1,0750,680 इतका आहे. आजचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.17 टक्के इतका आहे.
बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे आणि ती आता आज 10,594,694 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 12,179 इतकी बरे झालेल्या रुग्णांची नोंद आहे.
नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 85.34 टक्के रुग्ण हे 6 राज्यांमधील असल्याचे लक्षात आले आहे.
केरळमध्ये एकाच दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे, नव्याने बरे झालेली रुग्ण संख्या 4,652 इतकी आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,744 इतके रुग्ण बरे झाले आहेत तर तामिळनाडूमध्ये 947 इतकी बरे झालेल्यांची नोंद आहे.
गेल्या 24 तासात 16,577 इतकी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद आहे.
नवीन रुग्णसंख्येपैकी 86.18 टक्के रुग्णसंख्या ही 6 राज्यांमधील आहे.
महाराष्ट्रात सातत्याने नवीन रुग्णसंख्यात वाढ होत असून ती 8,702 इतकी आहे. त्यानंतर केरळमध्ये 3,677 तर पंजाबमध्ये 563 इतकी नव्याने नोंद झालेली रुग्ण संख्या आहे.
गेल्या 24 तासात 120 मृत्यूंची नोंद झाली आहे.
एकूण मृत्यूंपैकी 85.83 टक्के मृत्यूंची नोंद ही 6 राज्यांमधून आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (56) मृत्यू नोंदविण्यात आले. केरळमध्ये 14 मृत्यू आणि पंजाबमध्ये 13 मृत्यूंची नोंद झाली.