16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींचे कोविड-19 लसीकरण

सर्व वैज्ञानिक संस्थांशी विचार विनिमय केल्यानंतर केंद्र सरकारने 16 मार्च 2022 पासून भारतीय नागरिकांमधील वय वर्षे 12 ते 13 आणि 13 ते 14 या वयोगटातील (म्हणजेच 2008,2009 आणि 2010 या वर्षी जन्मलेल्या म्हणजेच ज्यांनी वयाची  12 वर्षे आधीच पूर्ण केली आहेत अशा )मुलामुलींचे  कोविड प्रतिबंधक लसीकरण  सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलामुलींना हैदराबाद येथील बायोलॉजिकल इव्हान्स या कंपनीतर्फे निर्मित कोर्बेव्हॅक्स या प्रकारच्या कोविड प्रतिबंधक लसीची मात्रा देण्यात येईल.

देशभरात सध्या सुरु असलेल्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये 14 वर्षांहून अधिक वयाच्या मुलामुलींचे लसीकरण यापूर्वीच सुरु करण्यात आलेले आहे  हे लक्षात घेतले पाहिजे.

तसेच सरकारने, कोविड प्रतिबंधक लसीची खबरदारीची मात्रा घेण्यासाठी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि सहव्याधी असलेल्याच व्यक्तींना पात्र ठरविणारी अट  देखील रद्द केली आहे. आता 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली प्रत्येक व्यक्ती 16 मार्च 2022 पासून कोविड प्रतिबंधक लसीची खबरदारीची मात्रा घेण्यास पात्र असणार आहे.