महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरूच आहे. या 8 राज्यांमध्ये नवीन रुग्णांपैकी 84.61 टक्के रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत 72,330 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 39,544 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 4,563 आणि कर्नाटकात 4,225 नवीन रुग्ण आढळले आहेत.
खाली दाखवल्याप्रमाणे दहा राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा चढता आलेख आहे .
भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 5,84,055 वर पोहोचली आहे. ही संख्या देशातील एकूण सकारात्मक रुग्णसंख्येच्या 4.78 टक्के आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकूण 78.9 टक्के रुग्ण आहेत. एकट्या महाराष्ट्रात देशातील सक्रिय रुग्णसंख्येच्या 61 % हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
खाली दिलेला आलेख एकूण चाचण्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी असणारी राज्ये दर्शवतो. आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण एकूण चाचण्यांपेक्षा 70 टक्क्यांहून अधिक करण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
45 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड -19 लसीकरणाचा पुढील टप्पा आजपासून सुरू झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 10,86,241 सत्राद्वारे 6.5 कोटीहून अधिक (6,51,17,896) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये 82,60,293 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिली मात्रा ), 52,50,704 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरी मात्रा), 91,74,171 आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा ), 39,45,796 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा), 45 वर्षावरील आणि सह व्याधी असणारे 78,36,667 (पहिली मात्रा), 17,849 (दुसरी मात्रा) तर साठ वर्षावरील 3,05,12,070 (पहिली मात्रा),1,20,346 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
लसीकरण अभियानाच्या 75 व्या दिवशी ((31 मार्च 2021) लसीच्या 20,63,543 मात्रा देण्यात आल्या. 39,484 सत्राद्वारे 17,94,166 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 2,69,377 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली.
भारतात एकूण 1,14,74,683 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 93.89 टक्के .आहे.
गेल्या 24 तासात 40,382 रुग्ण कोरोनातून बरे झाले
गेल्या 24 तासात 459 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 83.01 टक्के मृत्यू सहा राज्यातले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 227 जणांचा मृत्यू झाला. तर पंजाबमध्ये 55 जणांचा मृत्यू झाला.
गेल्या 24 तासांत, पंधरा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांत कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. यामध्ये चंदीगड , झारखंड , ओदिशा , लडाख (केंद्रशासित प्रदेश ), दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव , पुदुच्चेरी , मणिपूर , त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, लक्षद्वीप, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार बेटे, आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.