Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारताची सक्रिय रुग्णसंख्या आज 1.46 लाखांवर

भारताच्या लसीकरण मोहिमेने 1.21 कोटींचा टप्पा ओलांडला

भारताने सक्रिय रुग्णसंख्या 1.50 लाखांखाली ठेवण्यात यश मिळवले आहे.देशातील सक्रिय रुग्णसंख्या आज  1,46,907 इतकी आहे. सध्याची सक्रिय रुग्णसंख्या भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.33 टक्के इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 13,742 इतक्या नवीन रुग्णांची  नोंद झाली असून 14,037 रुग्ण बरे झाले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्येत  399  इतकी निव्वळ  घट झाली आहे.

खाली दिलेल्या तक्त्यात गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत झालेला बदल दाखवला  आहे.  महाराष्ट्रात 298 रुग्णांची  भर पडली आहे, तर केरळमध्ये 803 रुग्णांची घट झाली  आहे.

गेल्या एका आठवड्यात 12 राज्यांमध्ये दररोज सरासरी  100 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. महाराष्ट्र त्यापैकी एक आहे.

आज 24 फेब्रुवारी,2021 रोजी,  सकाळी 7  वाजेपर्यंत एकूण 2,54,356 सत्रांद्वारे एकूण 1,21,65,598 लाभार्थ्यांचे  लसीकरण झाल्याचा अंदाज आहे.   यामध्ये  64,98,300 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 13,98,400 एचसीडब्ल्यू (2 रा डोस) आणि 42,68,898 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) समाविष्ट आहे.

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated
1stDose 2ndDose Total Doses
1 A&NIslands 5,565 2,018 7,583
2 AndhraPradesh 4,45,327 1,11,483 5,56,810
3 ArunachalPradesh 22,419 5,497 27,916
4 Assam 1,75,185 15,189 1,90,374
5 Bihar 5,32,936 59,521 5,92,457
6 Chandigarh 15,766 1,237 17,003
7 Chhattisgarh 3,58,080 30,946 3,89,026
8 Dadra&NagarHaveli 5,028 261 5,289
9 Daman&Diu 1,808 254 2,062
10 Delhi 3,34,333 24,762 3,59,095
11 Goa 15,804 1,280 17,084
12 Gujarat 8,26,583 78,471 9,05,054
13 Haryana 2,15,743 53,110 2,68,853
14 HimachalPradesh 97,607 12,672 1,10,279
15 Jammu&Kashmir 2,17,910 10,285 2,28,195
16 Jharkhand 2,67,556 14,578 2,82,134
17 Karnataka 5,69,416 1,57,944 7,27,360
18 Kerala 4,14,509 62,299 4,76,808
19 Ladakh 7,368 611 7,979
20 Lakshadweep 2,343 621 2,964
21 MadhyaPradesh 6,44,431 32,529 6,76,960
22 Maharashtra 9,48,539 80,824 10,29,363
23 Manipur 43,507 1,894 45,401
24 Meghalaya 28,190 1,200 29,390
25 Mizoram 17,315 3,490 20,805
26 Nagaland 24,985 4,819 29,804
27 Odisha 4,47,176 1,30,470 5,77,646
28 Puducherry 9,431 1,019 10,450
29 Punjab 1,33,718 23,867 1,57,585
30 Rajasthan 7,83,205 94,838 8,78,043
31 Sikkim 14,721 973 15,694
32 TamilNadu 3,59,063 41,337 4,00,400
33 Telangana 2,81,382 1,06,167 3,87,549
34 Tripura 85,789 16,349 1,02,138
35 UttarPradesh 11,40,754 86,021 12,26,775
36 Uttarakhand 1,36,058 11,242 1,47,300
37 WestBengal 7,20,569 81,108 8,01,677
38 Miscellaneous 4,17,079 37,214 4,54,293
  Total 1,07,67,198 13,98,400 1,21,65,598

आज भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,07,26,702 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज  97.25 टक्के आहे. बरे झालेले एकूण रुग्ण  आणि सक्रिय रूग्णामधील अंतर सतत वाढत आहे आणि आज ते 1,05,79,795 इतके  आहे.

काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 86.26 टक्के रुग्ण  6 राज्यांमधील  आहेत.

महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसात 5,869 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक नवे रुग्ण आढळत असून कालही  6,218 इतक्या मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासांत 104 मृत्यूची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूंमध्ये 81.73 टक्के मृत्यू पाच राज्यांमधील आहेत.  महाराष्ट्रात काल सर्वाधिक 51 मृत्यूची नोंद झाली.

Exit mobile version