रुग्ण बरे होण्याचा दर (97.52%) मार्च 2020 पासून सर्वोच्च पातळीवर
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने काल 56 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 62,67,149 सत्रांमध्ये, 56,06,52,030 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 55,05,075 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
यात समावेश आहे :
HCWs | 1st Dose | 1,03,51,471 |
2nd Dose | 81,39,176 | |
FLWs | 1st Dose | 1,82,91,828 |
2nd Dose | 1,23,10,279 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 20,53,38,194 |
2nd Dose | 1,66,89,475 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 11,96,50,340 |
2nd Dose | 4,68,78,435 | |
Over 60 years | 1st Dose | 8,20,88,223 |
2nd Dose | 4,09,14,609 | |
Total | 56,06,52,030 |
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचा दर 97.52% कायम असून तो मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,14,85,923 तर गेल्या 24 तासात 37,169 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत.
देशात गेल्या 24 तासात 35,178 नव्या रुग्णांची नोंद झाली.
सलग 52 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.
देशातील सक्रीय रुग्णसंख्या गेल्या 148 दिवसातली सर्वात कमी म्हणजे 3,67,415 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.14% आहे. ती मार्च 2020 पासूनच्या सर्वात कमी पातळीवर आहे.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 17,97,559 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 49.84 (49,84,27,083) कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 1.95% कायम आहे. गेले 54 दिवस तो 3% पेक्षा कमी आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 1.96% आहे. गेल्या 23 दिवसांपासून हा 3% पेक्षा कमी तर सलग 72 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.