भारतात रुग्ण बरे होण्याच्या दराने 80% पर्यंत पोचत महत्वपूर्ण टप्पा केला पार
भारतात रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दराने 80%पर्यंत पोहोचत महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
बरे होणाऱ्या रूग्णसंख्येत वाढ होऊन , भारतात सलग तिसऱ्या दिवशी 90,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद केली गेली.
गेल्या 24 तासात 93,356 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर,राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक
बरे झालेले 79 % नविन रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
आज बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या जवळपास 44 लाख (43,96,399) इतकी होती.जगात रूग्ण बरे होणाऱ्या संख्येच्या बाबतीत भारत उच्च स्थानावर पोचला आहे. ही संख्या जगातील एकूण संख्येच्या 19% आहे.