गेल्या 24 तासांत देशात 2,075 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.73% (covid 19)

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 181.04 हून अधिक  (1,81,04,96,924,) मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशभरात 2,31,51,545 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,965
2nd Dose 99,89,459
Precaution Dose 43,50,998
FLWs 1st Dose 1,84,12,044
2nd Dose 1,74,86,783
Precaution Dose 66,45,704
Age Group 12-14 years 1st Dose 11,68,106
Age Group 15-18 years 1st Dose 5,61,66,904
2nd Dose 3,53,41,348
Age Group 18-44 years 1st Dose 55,37,11,932
2nd Dose 45,89,25,575
Age Group 45-59 years 1st Dose 20,25,96,597
2nd Dose 18,36,27,889
Over 60 years 1st Dose 12,66,33,512
2nd Dose 11,43,73,173
Precaution Dose 1,06,63,935
Precaution Dose 2,16,60,637
Total 1,81,04,96,924

 

16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील बालकांना कोविड-19 लसींच्या  मात्रा देण्यास आरंभ झाला असून एकूण 11लाख (11,68,106)बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

भारतातील सक्रिय रुग्णभार सतत घसरत असून आज रूग्णसंख्या 27,802 इतकी खाली आला असून पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 0.06%इतकी आहे

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.73% आहे.गेल्या 24 तासांत 3,383 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,61,926 झाली आहे.

 

गेल्या 24 तासांत, देशात 2,075 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

 

 

गेल्या 24 तासांत देशात एकूण 3,70,514 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 22 लाखांहून अधिक (78, 22,28,685) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण सतत खाली येत असून  देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.41% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.56%.इतका आहे.