गेल्या 24 तासात 20,799 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारताच्या एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 90.79 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23,46,176 मात्रा देण्यात आल्या आहेत त्यामुळे भारताने 90.79 (90,79,32,861) कोटी कोविड-19 लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे.

88,05,668 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs 1st Dose 1,03,73,789
2nd Dose 89,34,169
 

FLWs

1st Dose 1,83,55,327
2nd Dose 1,51,09,293
 

Age Group 18-44 years

1st Dose 36,74,65,954
2nd Dose 8,83,14,532
 

Age Group 45-59 years

1st Dose 16,12,96,306
2nd Dose 7,85,84,116
 

Over 60 years

1st Dose 10,23,23,752
2nd Dose 5,71,75,623
Total 90,79,32,861

गेल्या 24 तासांत 26,718 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,31,21,247 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.89% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 99 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 20,799 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,64,458 असून ही रुग्णसंख्या गेल्या 200 दिवसातील निचांकी आहे.तसेच देशातील

आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.78% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढत आहे.

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,91,676  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.42 कोटींहून(57,42,52,400) अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.63% असून गेल्या 101 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.10% असून गेले सलग 35 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 118 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.