उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्याने घट सुरूच असून ही संख्या 1.55 लाखांपर्यंत खाली घसरली
जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
केवळ 19 दिवसांत सुमारे 45 लाख (44,49,552) लाभार्थ्यांचे कोविड 19 विरोधी लसीकरण करण्यात आले आहे.
केवळ 18 दिवसांत 40 लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारा भारत सर्वात वेगवान देश ठरला आहे. इतर अनेक देशांमध्ये जवळजवळ 65 दिवसांपूर्वी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारताने 16-1-2021 रोजी देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू केली.
दररोज लसीकरण केल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येतही हळूहळू वाढ दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांत 8,041 सत्रांमध्ये 3,10,604 लोकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत,84,617 सत्रे घेण्यात आली आहेत.
S.No. | State/UT | Beneficiaries Vaccinated |
1 | A & N Islands | 2,772 |
2 | Andhra Pradesh | 2,15,171 |
3 | Arunachal Pradesh | 9,846 |
4 | Assam | 43,607 |
5 | Bihar | 2,64,097 |
6 | Chandigarh | 4,399 |
7 | Chhattisgarh | 1,01,564 |
8 | Dadra & Nagar Haveli | 926 |
9 | Daman & Diu | 561 |
10 | Delhi | 81,433 |
11 | Goa | 6,326 |
12 | Gujarat | 3,11,251 |
13 | Haryana | 1,29,866 |
14 | Himachal Pradesh | 43,926 |
15 | Jammu & Kashmir | 26,634 |
16 | Jharkhand | 67,970 |
17 | Karnataka | 3,16,638 |
18 | Kerala | 2,46,043 |
19 | Ladakh | 1,511 |
20 | Lakshadweep | 807 |
21 | Madhya Pradesh | 3,30,722 |
22 | Maharashtra | 3,54,633 |
23 | Manipur | 5,872 |
24 | Meghalaya | 4,806 |
25 | Mizoram | 9,995 |
26 | Nagaland | 4,244 |
27 | Odisha | 2,11,346 |
28 | Puducherry | 3,222 |
29 | Punjab | 63,663 |
30 | Rajasthan | 3,63,521 |
31 | Sikkim | 3,425 |
32 | Tamil Nadu | 1,33,434 |
33 | Telangana | 1,76,732 |
34 | Tripura | 32,340 |
35 | Uttar Pradesh | 4,63,793 |
36 | Uttarakhand | 54,153 |
37 | West Bengal | 3,01,091 |
38 | Miscellaneous | 57,212 |
Total | 44,49,552 |
आतापर्यंत कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण केलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी 54.87 टक्के सात राज्यातील आहेत.
भारताची उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज 1.55 लाख (1,55,025) पर्यंत घसरली आहे.
भारताच्या सध्याच्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 1.44 टक्के आहे.
गेल्या काही आठवड्यांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक होत असलेले बदल सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट दर्शवत आहेत.
आज भारताचा दैनंदिन सकारात्मकता दर 1.82% आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये (19 दिवस) भारताने दैनंदिन सकारात्मकतेचा दर 2 टक्क्यांच्या खाली ठेवला आहे.
बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,04,80,455 झाली आहे.
नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आज 97.13 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या उपचाराधीन रुग्णसंख्येच्या 67.6 पट आहे.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 86.04 टक्के रुग्ण 6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.
महाराष्ट्रात काल एका दिवसात सर्वाधिक 7,030 रुग्ण बरे झालेआहेत. त्याखालोखाल केरळमध्ये गेल्या 24 तासांत 6,380 रुग्ण तर तमिळनाडूमध्ये 533 रुग्ण बरे झाले.
नवीन रुग्णांपैकी 84.67 टक्के रुग्ण 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
केरळमध्ये कालही 6,356 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,992 तर तामिळनाडूमध्ये 514 नवीन रुग्ण आढळले आहेत.
नवीन मृत्यूंपैकी 71.03 टक्के मृत्यू सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात काल सर्वाधिक (30) मृत्यू झाले. केरळमध्ये 20 तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यात प्रत्येकी 7 मृत्यूची नोंद झाली आहे.