19 दिवसात सुमारे 45 लाख लाभार्थ्यांना कोविड19 प्रतिबंधक लस

उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्याने घट सुरूच असून ही संख्या 1.55 लाखांपर्यंत खाली घसरली

जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

केवळ 19 दिवसांत सुमारे 45 लाख (44,49,552) लाभार्थ्यांचे कोविड 19 विरोधी लसीकरण करण्यात आले आहे.

केवळ 18 दिवसांत 40 लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारा भारत सर्वात वेगवान देश ठरला आहे. इतर अनेक देशांमध्ये जवळजवळ 65 दिवसांपूर्वी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारताने 16-1-2021 रोजी देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू केली.

दररोज लसीकरण केल्या जाणाऱ्या  लाभार्थ्यांच्या संख्येतही हळूहळू वाढ दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत 8,041 सत्रांमध्ये 3,10,604 लोकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत,84,617 सत्रे घेण्यात आली आहेत.

 

S.No. State/UT Beneficiaries Vaccinated
1 A & N Islands 2,772
2 Andhra Pradesh 2,15,171
3 Arunachal Pradesh 9,846
4 Assam 43,607
5 Bihar 2,64,097
6 Chandigarh 4,399
7 Chhattisgarh 1,01,564
8 Dadra & Nagar Haveli 926
9 Daman & Diu 561
10 Delhi 81,433
11 Goa 6,326
12 Gujarat 3,11,251
13 Haryana 1,29,866
14 Himachal Pradesh 43,926
15 Jammu & Kashmir 26,634
16 Jharkhand 67,970
17 Karnataka 3,16,638
18 Kerala 2,46,043
19 Ladakh 1,511
20 Lakshadweep 807
21 Madhya Pradesh 3,30,722
22 Maharashtra 3,54,633
23 Manipur 5,872
24 Meghalaya 4,806
25 Mizoram 9,995
26 Nagaland 4,244
27 Odisha 2,11,346
28 Puducherry 3,222
29 Punjab 63,663
30 Rajasthan 3,63,521
31 Sikkim 3,425
32 Tamil Nadu 1,33,434
33 Telangana 1,76,732
34 Tripura 32,340
35 Uttar Pradesh 4,63,793
36 Uttarakhand 54,153
37 West Bengal 3,01,091
38 Miscellaneous 57,212
Total 44,49,552

आतापर्यंत कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण केलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी 54.87 टक्के  सात राज्यातील आहेत.

भारताची उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज 1.55 लाख (1,55,025) पर्यंत  घसरली आहे.

भारताच्या सध्याच्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण  एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 1.44 टक्के आहे.

गेल्या काही आठवड्यांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक होत असलेले बदल सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट दर्शवत आहेत.

आज भारताचा दैनंदिन सकारात्मकता दर 1.82% आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये (19 दिवस) भारताने दैनंदिन सकारात्मकतेचा दर 2 टक्क्यांच्या खाली ठेवला आहे.

बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,04,80,455 झाली आहे.

नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आज  97.13 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या उपचाराधीन रुग्णसंख्येच्या  67.6 पट आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 86.04 टक्के रुग्ण  6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये  आहेत.

महाराष्ट्रात काल एका दिवसात सर्वाधिक 7,030 रुग्ण बरे झालेआहेत. त्याखालोखाल  केरळमध्ये गेल्या  24  तासांत 6,380 रुग्ण तर तमिळनाडूमध्ये 533 रुग्ण बरे झाले.

नवीन रुग्णांपैकी 84.67 टक्के रुग्ण 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये कालही 6,356 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,992 तर तामिळनाडूमध्ये 514 नवीन रुग्ण आढळले आहेत.

नवीन मृत्यूंपैकी 71.03 टक्के मृत्यू सहा  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात काल सर्वाधिक (30) मृत्यू झाले. केरळमध्ये 20  तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यात प्रत्येकी 7 मृत्यूची नोंद झाली आहे.