गेल्या 18 दिवसांत 4 लाख व्यक्तींचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करून भारत झाला जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश
कोविड महामारीशी सुरु असलेल्या लढ्यात यशाची नवनवीन शिखरे गाठत भारताचे मार्गक्रमण सातत्याने सुरु आहे.
याच मार्गावर यशाचा मोठा टप्पा गाठत, भारताने तब्बल 40 लाख लोकांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करून, जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश म्हणून नोंद केली आहे.
देशाने हा टप्पा 18 दिवसांत गाठला आहे.
नागरिकांना कोविड – 19 लसीचे सर्वात जास्त डोस देणाऱ्या, जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होता. तसेच भारताने अत्यंत वेगाने लसीकरणाची मोहीम यापुढेही सुरुच ठेवली आहे.
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात इतर अनेक आघाड्यांवर देखील देश रोज विविध प्रकारचे यश संपादन करीत आहे.
देशातील अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, लक्षद्वीप, लडाख(कें.प्र.), सिक्कीम, मणिपूर,पुदुचेरी, गोवा, ओडिशा आणि आसाम या 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ आणि मृत्युदरात सातत्याने घट यामुळे, भारतात सक्रीय कोविड–19 रुग्णांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम आहे.
देशात गेल्या 24 तासांत सक्रीय कोविड रुग्णांची संख्या कमी होऊन 1,60,057 इतकी झाली आहे. त्यामुळे देशातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांचे प्रमाण एकूण कोविड रुग्णांच्या 1.5% पेक्षाही कमी (सध्या 1.49% इतके कमी) झाले आहे.
देशात गेल्या 24 तासांत 11,039 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. हा गेल्या 7 महिन्यांच्या काळातील नीचांक आहे. तर याच 24 तासांच्या कालावधीत 14,225 रुग्ण बरे झाले. यामुळे, देशाच्या एकूण सक्रीय रुग्णसंख्येत 3,296 ची घसरण झाली.
देशात एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या 1,04,62,631 आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सर्वात जास्त राष्ट्रीय रोगमुक्ती दर असलेल्या देशांमध्ये भारताने (97.08%) स्थान टिकवून ठेवले आहे.
एकूण सक्रीय कोविड रुग्ण आणि रोगमुक्त झालेले यांच्यातील तफावत सतत वाढत असून सध्या ती 1,03,02,574 इतकी आहे.
देशातील 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5000 पेक्षाही कमी सक्रीय कोविड रुग्ण आहेत.
देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साप्ताहिक पातळीवर सक्रीय कोविड बाधितांच्या नोंदीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा (1.91%) जास्त आहे. केरळमध्ये साप्ताहिक पातळीवर सक्रीय कोविड बाधितांच्या नोंदीचा दर12% तर छत्तीसगड ,मध्ये 7% आहे.
देशभरात सुरु असलेल्या कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 3 फेब्रुवारी2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 41 लाखांहून जास्त (41,38,918) लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
S. No. | State/UT | Beneficiaries vaccinated |
1 | A & N Islands | 2,727 |
2 | Andhra Pradesh | 1,87,252 |
3 | Arunachal Pradesh | 9,791 |
4 | Assam | 42,435 |
5 | Bihar | 2,22,153 |
6 | Chandigarh | 4,019 |
7 | Chhattisgarh | 79,676 |
8 | Dadra & Nagar Haveli | 867 |
9 | Daman & Diu | 469 |
10 | Delhi | 74,068 |
11 | Goa | 5,422 |
12 | Gujarat | 2,87,852 |
13 | Haryana | 1,27,893 |
14 | Himachal Pradesh | 39,570 |
15 | Jammu & Kashmir | 26,634 |
16 | Jharkhand | 55,671 |
17 | Karnataka | 3,16,368 |
18 | Kerala | 2,24,846 |
19 | Ladakh | 1,234 |
20 | Lakshadweep | 807 |
21 | Madhya Pradesh | 2,98,376 |
22 | Maharashtra | 3,18,744 |
23 | Manipur | 4,739 |
24 | Meghalaya | 4,694 |
25 | Mizoram | 9,932 |
26 | Nagaland | 4,093 |
27 | Odisha | 2,08,205 |
28 | Puducherry | 3,077 |
29 | Punjab | 61,381 |
30 | Rajasthan | 3,39,218 |
31 | Sikkim | 2,647 |
32 | Tamil Nadu | 1,20,745 |
33 | Telangana | 1,70,043 |
34 | Tripura | 32,196 |
35 | Uttar Pradesh | 4,63,793 |
36 | Uttarakhand | 43,430 |
37 | West Bengal | 2,88,245 |
38 | Miscellaneous | 55,606 |
Total | 41,38,918 |
गेल्या 24 तासांत, एकूण 3,845 सत्रांमध्ये झालेल्या लसीकरणात 1,88,762 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणासाठी आतापर्यंत एकूण 76,576 सत्रे घेण्यात आली आहेत.
एका दिवसात लसीकरण करण्यात येणाऱ्यांच्या संख्येत दररोज सतत वाढ दिसून येत आहे.
नव्या कोविड मुक्तांपैकी 85.62% रुग्ण 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळमध्ये सर्वात जास्त(5,747) व्यक्ती कोविडमुक्त झाल्या तर महाराष्ट्रात 4,011 आणि तामिळनाडू मध्ये 521 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले.
नव्या कोविड बाधित रुग्णांपैकी 83.01% रुग्ण देशातील 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 5,716 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. त्याखालोखाल, महाराष्ट्रात 1,927 आणि तामिळनाडूमध्ये 510 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 110 कोविड बाधितांचा मृत्यू झाला.
यापैकी 66.36% रुग्ण देशातील 5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते.
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 30 कोविडबाधितांचा मृत्यू झाला तर केरळमध्ये 16 जणांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले.