Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 133.17 कोटीहून अधिक

corona vaccination

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  19,10,917 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   133.17 कोटीपेक्षा जास्त   (1,33,17,84,462) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,38,93,021 सत्रांद्वारे या  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

HCWs 1st Dose 1,03,85,628
2nd Dose 96,00,597
 

FLWs

1st Dose 1,83,83,021
2nd Dose 1,66,93,235
 

Age Group 18-44 years

1st Dose 47,85,34,066
2nd Dose 27,04,21,555
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,96,04,286
2nd Dose 13,35,62,704
 

Over 60 years

1st Dose 11,85,50,001
2nd Dose 8,60,49,369
Total 1,33,17,84,462

गेल्या 24 तासात 7,973 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,41,30,768

रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.37% झाला असून मार्च 2020 पासूनचा  सर्वोच्च आहे.

गेल्या   46 दिवसांपासून  15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 7,350 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  91,456  असून 561 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.26% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 8,55,692 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 65.66 कोटीहून अधिक  (65,66,72,451) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या  0.69% असून गेले   29 दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.86% असून गेले 70 दिवस 2% पेक्षा कमी आणि  105 दिवस  3% पेक्षा कमी आहे.

 

Exit mobile version