Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 66 कोटी मात्रांचा टप्पा

corona vaccination

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 47,092 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाने 66  कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा काल  पार केला. भारताने गेल्या 24 तासात 81,09,244 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण  66.30 कोटीपेक्षा जास्त मात्रा (66,30,37,334) दिल्या आहेत. एकूण 69,60,983 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

 

HCWs

1st Dose 1,03,59,391
2nd Dose 84,14,897
 

FLWs

1st Dose 1,83,25,922
2nd Dose 1,33,20,833
 

Age Group 18-44 years

1st Dose 25,97,17,695
2nd Dose 2,98,87,208
 

Age Group 45-59 years

1st Dose 13,33,18,523
2nd Dose 5,59,07,199
 

Over 60 years

1st Dose 8,80,78,095
2nd Dose 4,57,07,571
Total 66,30,37,334

 

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 35,181 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,20,28,825

रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून बरे होण्याचा दर  97.48%.झाला आहे.

सलग  67  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 47,092 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,89,583 आहे.उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.19% आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 16,84,441 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 52.48 कोटीहून अधिक (52,48,68,734) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.62% असून गेले 69 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.80% असून हा दर गेले  87  दिवस  5% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version