Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने केला 89 कोटी मात्रांचा टप्पा पार

गेल्या 24 तासांत देशात 26,727 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 64,40,451 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 89 कोटी मात्रांचा  (89,02,08,007) टप्पा पार केला आहे. 86,46,674सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

HCWs 1st Dose 1,03,72,796
2nd Dose 88,95,117
 

FLWs

1st Dose 1,83,52,779
2nd Dose 1,50,06,337
 

Age Group 18-44 years

1st Dose 36,05,69,116
2nd Dose 8,30,27,778
 

Age Group 45-59 years

1st Dose 15,95,61,641
2nd Dose 7,68,32,812
 

Over 60 years

1st Dose 10,13,72,713
2nd Dose 5,62,16,918
Total 89,02,08,007

गेल्या 24 तासांत 28,246 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या  3,30,43,144 झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.86% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 96 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत, 26,727 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,75,224 इतकी आहे आणि ही गेल्या 196 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.82% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,20,899 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 57 कोटी 4 लाखांहून अधिक (57,04,77,338) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.70% असून गेले 98 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.76% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 32 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 115  दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे

Exit mobile version